Advertisement

चिनी नववर्षाचा वारसा जपणारं मुंबईतलं मंदिर


SHARES

मुंबईचं एकमेव चायनीज मंदिर जिथे २५ जानेवारीला नववर्ष साजरा करण्यात येतं. मुंबईच्या माझगाव गोदीजवळ १९१९ साली हे मंदिर उभारण्यात आलं होतं. १९६२ साली भारत-चीन युद्धानंतर त्यातल्या अनेकांनी हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया अशा ठिकाणी स्थलांतर केलं. पण भारताच्या प्रेमात पडलेल्या काही चिनी नागरिकांनी मुंबईत राहूनच चिनी नववर्षाचा वारसा जपला आहे.

दीडशे वर्ष जुनं मंदिर

मुंबई ही सात बेटांनी बनली आहे. माझगाव हे त्यापैकीच एक. या माझगाव डॉकजवळच्या इमारतीत चायना टेंपल (चिनी मंदिर) आहे. भारतात कोलकाता आणि मुंबई या दोनच ठिकाणी चिनी मंदिरं आहेत. माझगावचे चिनी मंदिर सुमारे दीडशे वर्ष जुने असून ते मुंबईतील चिनी पंरपरा आणि चिनी संस्कृतीचं प्रतीक आहे.

कुणी उभारलं मंदिर?

'क्वॉन टाई कोन' हा सदाचरणी आणि पराक्रमी योद्धा होता. तो उत्तम मार्गदर्शक म्हणून ओळखला जायचा. त्याचे मार्गदर्शन मिळावं यासाठीच ईस्ट इंडिया कंपनीत काम करणाऱ्या खलाशांनी १९१९ साली मुंबईत हे मंदिर उभारलं.


मुंबईतल्या या '५' लेण्यांमध्ये झळकतो इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप



चायना टाऊन

अठराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीच्या काळात चिनी मुंबईत आले होते. गोदीत काम करणाऱ्या चिनी लोकांनी माझगावमध्ये छोटेसे चायना टाऊनच वसवले होते. १९६२ ला भारत-चीन यांच्यात युद्ध झाले. युद्धानंतर चिनी नागरिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यामुळे अनेक चिनी मुंबई सोडून मायदेशी परत गेले. पण काहींनी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. आजही चायना टाऊन त्याच जागी आहे. पण बोटावर मोजता येतील एवढीच चिनी घरं उरली आहेत.

कुठे : चिनी बौद्ध मंदिरनवाब टँकभायखळा/डॉकयार्ड रोड
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६.३०



हेही वाचा

मुंबईच्या हृदयात वसलेलं १०० वर्षे जुने जपानी मंदिर

मुंबईतील चिनी वारसा जपणारं चायना टेंपल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा