Advertisement

लेडिज वॉशरुममध्ये आढळला सीसीटीव्ही!


लेडिज वॉशरुममध्ये आढळला सीसीटीव्ही!
SHARES

प्रवासात, रस्त्यावरून महिलांची छेडछाड होणे किंवा काही ठिकाणी महिलांच्या वॉशरुममध्ये सीसीटीव्ही लावल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असेल. पण प्रार्थनास्थळातही महिलांसोबत जर असेच प्रकार होत असतील तर? विश्वास बसणार नाही ना? पण 'मुंबई मिरर' या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक असलेल्या माहीममधील सेंट मायकल या चर्चमध्ये चक्क महिलांच्या वॉशरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आला आहे.

ही बाब उघडकीस आल्यानंतर मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड गेसियस यांनी सदर घटनेची दखल घेत चर्चला पत्र लिहून जाब विचारला आहे.



पोर्तुगीजांनी 1534 मध्ये माहीम येथे हे चर्च बांधले होते. चर्चमधल्या महिलांच्या वॉशरुमध्ये कॅमेरा आढळून आल्यानंतर असोसिएशन ऑफ कन्सर्न्ड कॅथलिक्सचे उपाध्यक्ष केरेन सी डिसूजा यांनीही चर्चला पत्र पाठवले आहे.

'सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांना काय कॅप्चर करायचे आहे? कोणत्या महिलेची पँट सरकलेली आणि कोणत्या महिलेची साडी निसटलेली आहे, हे त्यांना पहायचे आहे का? महिलांच्या प्रायव्हसीचे हे उल्लंघन आहे. महिलांचा आदर व्हायला हवा. लाइव्ह पोर्न पाहण्यासाठी येथे गर्दी व्हावी, असे आम्हाला वाटत नाही', अशा शब्दांत डिसोजा यांनी पत्रातून आपला राग व्यक्त केला आहे. आपण पाठवलेल्या या पत्रानंतर चर्च याबाबत निर्णय घेऊन तो कॅमेरा महिलांच्या वॉशरुममधून हटवेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

महिलांची सुरक्षा आणि चोरीच्या घटना होऊ नयेत, यासाठीच हा कॅमेरा लावण्यात आल्याचा दावा संबंधित चर्चच्या पादरींनी केला होता. त्यावर 'जर चोरी होण्याची एवढीच भीती असेल, तर वॉशरुमच्या 50 मीटर परिसरातही सुरक्षा रक्षक तैनात करायला हवेत' अशी मागणी डिसोजा यांनी केली.

बी. डी. डिसूजा हे नेहमीच त्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत असतात. त्यांचे म्हणणे आहे की, कॉरिडोअर कॅमेरा लावणे योग्य आहे, पण वॉशरुममध्ये कॅमेरे लावणे ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.

केवळ महिलांच्या सुरक्षेसाठी हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. याबाबत अजूनपर्यंत तरी कोणीही तक्रार केलेली नाही. जर याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी तक्रार मांडावी, त्यांचे समाधान नक्की केले जाईल, असे सेंट मायकल चर्चचे फादर सिमॉन बोगर्स यांनी सांगितले आहे.



हेही वाचा - 

बलात्काराचा संशयित सीसीटीव्हीत कैद

चेंजिंग रूमच्या स्क्रूमध्येही असू शकतो छुपा कॅमेरा!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा