मुंबईचे डबेवाले शुक्रवारी आणि शनिवारी सुट्टीवर

दररोज मुंबईकरांना घरगुती जेवणाचे डबे पोहचवणारे मुंबईचे डबेवाले शुक्रवार आणि शनिवारी सुट्टीवर जाणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी डबेवाले पंढरपूरला जाणार आहेत.

SHARE

दररोज मुंबईकरांना घरगुती जेवणाचे डबे पोहचवणारे मुंबईचे डबेवाले शुक्रवार आणि शनिवारी सुट्टीवर जाणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी डबेवाले पंढरपूरला जाणार आहेत. त्यामुळं या २ दिवशी डबेवाले मुंबईकरांना जेवणाचा पुरवठा करु शकणार नाहीत, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

भाविकांची गर्दी

मुंबईसह राज्यभरातील भाविक लाखोंच्या संख्येनं आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. तसंच, मुंबईतील विठ्ठल मंदिरातही भाविकांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली आहे. पंढरपुरात सर्वत्त भक्तीमय वातावरण असून अवघा महाराष्ट्रही विठुरायाच्या भक्तीत आणि पूजाअर्चांमध्ये व्यस्त आहे.

विठुरायाला साकडं

आषाढी एकादशीनिमित्त आपल्याला जीवनात, व्यावसायात सुख-समृद्धी लाभावी यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाकडं सर्वजण साकडं घालत आहेत. तसंच, मुंबईचे डबेवालेही विठुरायाला साकडं घालण्यासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत.हेही वाचा -

भाडेकपातीनंतर बेस्टच्या ३ मार्गावर एसी बसेस

वडाळ्यातील विठ्ठल मंदिर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदलसंबंधित विषय
ताज्या बातम्या