Advertisement

पेट्रोल नव्वदी पार; २ वर्षांतील उच्चांकी दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा वाढ झाली असून, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे २८ आणि २९ पैसे प्रतिलिटर वाढविलं आहेत.

पेट्रोल नव्वदी पार; २ वर्षांतील उच्चांकी दर
SHARES

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा वाढ झाली असून, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे २८ आणि २९ पैसे प्रतिलिटर वाढविलं आहेत. सध्याचे दर २ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळं अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा एकदा ९० पार गेले आहेत. मुंबईत ६ डिसेंबरला पेट्रोलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले. 

मुंबईत ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचे दर ९१.३९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर ८० डॉलर्स प्रतिबॅरल एवढे होते. आता ते ४८ डॉलर्स इतके आहेत. तसंच, राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहेत. पोर्ट ब्लेअरला एक लिटर पेट्रोलसाठी सर्वात कमी ७०.२३ रुपये एवढे दर आहेत. इंधन दरवाढीतून सरकारनं दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर १ जूनपासून दरवाढीस सुरूवात केली होती. सरकारनं २२ सप्टेंबरपासून पुन्हा दरवाढीला ब्रेक लावला होता. २० नोव्हेंबरला पुन्हा दरवाढ केली होती. गेल्या १७ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर २.३५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.१५ रुपयांनी वाढले आहेत.

केंद्र सरकारकडून सध्या पेट्रोलवर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते. तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येतो. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा