Advertisement

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक; सामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबईत दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल, डिझेलचे भाव आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहेत.

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक; सामान्यांच्या खिशाला कात्री
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल, डिझेलचे भाव आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहेत. महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढणार भार इंधनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे झेपत नाही. त्यामुळं आता गाडी चालवायची की नाही हा प्रश्न वाहन चालकांना सतावतो आहे. दरम्यान, दिल्ली, मुंबईसहीत अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग झाले आहे.

रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी १११.७७ रुपये मोजावे लागत असून, दिल्लीतही हे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे १०५.८४ रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर १०२.५२ रुपये असून, दिल्लीत ९४.५७ रुपये आहेत.

हवाई इंधन (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल- एटीएफ) ज्या दरांत विमान वाहतूक कंपन्यांना विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर आता ३३ टक्क्यांनी अधिक आहेत. दिल्लीत ‘एटीएफ’चे दर एका लिटरला ७९ रुपये इतके आहेत. देशभरातील सर्वात महाग इंधन राजस्थानमधील गंगानगर या सीमेवरील शहरात मिळत असून, तेथे पेट्रोलचे दर लिटरला ११७.८६ रुपये, तर डिझेलचे दर १०५.९५ रुपये आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा