Advertisement

वर्ल्ड फूड डे - मुंबईत कुपोषणाने काढले डोके वर


वर्ल्ड फूड डे - मुंबईत कुपोषणाने काढले डोके वर
SHARES

वर्ल्ड फूड डे म्हणजेच जागतिक खाद्य दिवस हा 16 ऑक्टोबरला पाळला जातो. 1945 मध्ये 16 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली होती. याच दिवशी खाद्य आणि कृषी संघटनेची देखील स्थापना झाली. त्यामुळे दरवर्षी हा दिवस वर्ल्ड फूड डे म्हणून पाळला जातो.


लोकांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा खरा उद्देश आहे. पण मुंबईसारख्या शहरात या दिवसाचे महत्त्व कमी होत चालले आहे. आरोग्यावर काम करणाऱ्या ‘अपनालय’ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबईत 20 टक्क्यांहून अधिक बालकं कुपोषित आहेत. टोलेजंग इमारती, नवीन लाइफस्टाइल यामुळं मुंबईचा चेहरा बदलू लागला असला तरी याच मुंबईच्या गर्भातलं भयानक वास्तव या सामाजिक संस्थेनं पुढं आणलं आहे.


गोवंडी, खार, कुर्लामध्ये कुपोषित मुलांची संख्या सर्वात जास्त

अपनालय संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार गोवंडीमध्ये प्रत्येक चार मुलांमागे दोन मुले कुपोषित आहेत. तर 35 टक्के बालकांचे वजन सामान्यपेक्षाही कमी आहे. 35 टक्क्याहून अधिक कुटुंबीयांचे मासिक वेतन 4 ते 6 हजाराच्या दरम्यान आहे. गोवंडी डम्पिंग ग्राऊंडच्या जवळपास राहणाऱ्या तीन हजार लहान मुलांवर 'अपनायन'ने केलेल्या सर्वेक्षणानंतर ही माहिती उघडकीस आली आहे.


तीन मुलांच्या पाठी एक मूल कुपोषित

मुंबई महानगरीच्या नागरी सेवा सुविधांची काळजी वाहण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पालिकेचे वार्षिक बजेट हजारो कोटींच्या घरात आहे. पालिकेच्या शाळांवर कोट्यवधी खर्च केल्याचा दावाही पालिकेने अनेकदा केला. पण माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आलेल्या माहितीनुसार पालिका शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक तीन मुलांच्या पाठी एक मूल कुपोषित आहे. भारतात कुपोषणाच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. पालिकेच्या शाळांमध्ये मुलांना मिडे मिल म्हणजे मध्यान्नही दिले जाते. असे असतानाही पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. प्रज्ञा फाऊंडेशनने आरटीआयअंतर्गत ही माहिती उघडकीस आणली आहे


प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मुलांमधील कुपोषणाची संख्या

  • 2014 मध्ये 11,831
  • 2014-2015 मध्ये 53408
  • 2015-2016 पासून ते आतापर्यंत ही संख्या 64,681 इतकी झाली आहे

हेही वाचा -

कुपोषणात मुंबई आफ्रिकेच्याही पुढं..!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा