Advertisement

अॅमेझॉनवरही आता करा मराठीत शॉपिंग

अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीनं आपल्या मराठमोळ्या ग्राहकांच्या सोयीसाठी सुविधा सुरू केली आहे.

अॅमेझॉनवरही आता करा मराठीत शॉपिंग
SHARES

अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीनं आपल्या मराठमोळ्या ग्राहकांच्या सोयीसाठी आता मराठीतही शॉपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर आता विक्रेत्यांनाही मराठीत व्यवहार करता येणार आहेत.

अॅमेझॉनच्या मार्केटप्लेसमध्ये आता विक्रेत्यांना मराठी, मल्याळम, तेलुगु आणि बंगाली या भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसंच त्यांचा व्यवहार पाहता येणार आहे.

आगामी सणासुदीच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्याच्या मदतीनं अनेक विक्रेते, संभाव्य विक्रेते आणि नव्या विक्रेत्यांना आपला व्यवहार सुरू ठेवण्यासाठी निरनिराळ्या स्तरांच्या बाजारातून लाभ मिळेल. तसंच ते आपल्याला हव्या असलेल्या भाषेतूनही काम करू शकतील, असं अॅमेझॉननं एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे.

आता आपल्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना अॅमेझॉन मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांमध्ये ऑनलाइन विक्री करण्याची आणि खरेदी करण्याची संधी देत आहे. या भाषांचा वापर करून पहिल्यांदा विक्रेता अॅमेझॉनच्या विक्रेत्याच्या रूपात रजिस्ट्रेशन करून ऑर्डर मॅनेज करू शकतात. अॅमेझॉनशी सद्यस्थितीत साडेआठ लाख विक्रेते जोडले गेले आहेत.हेही वाचा

आयफोन-१३ अखेर बाजारात लाँच

लसीचा स्लॉट उपलब्ध असल्यास मिळणार अलर्ट, IIT-मुंबईकडून अॅप विकसित

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा