Advertisement

आयफोन-१३ अखेर बाजारात लाँच


आयफोन-१३ अखेर बाजारात लाँच
SHARES

अ‍ॅपलच्या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर मंगळवारी संपली. अ‍ॅपलने आयफोन १३ सह अ‍ॅपल वॉच -७, आयपॅड मिनी आदी उत्पादनांची घोषणा केली असून, या अद्ययावत उत्पादनांमध्ये अधिकाधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी कार्यक्रमाद्वारे नव्या उत्पादनांची घोषणा केली. त्यात आयफोन १३ हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. नव्या १०.२ इंची आयपॅडच्या किमती ३०,९०० रुपयांपासून आहेत.

अ‍ॅपल ७ वॉचमध्येही नव्या सुविधा असून, अनेक रंगसंगती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘न्यू आयपॅड मिनी’ ५ जी युुक्त असून, त्याचा डिस्प्ले ८.३ इंची आहे.

नवा आयपॅड २०२१ हा एलटीई आणि वायफाय सुविधायोग्य असून त्याची क्षमता ६४ जीबी इतकी असेल. अ‍ॅपल आयपॅड मिनी हेसुद्धा बाजारात आणले असून ते नव्या गुलाबी रंगात उपलब्ध आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा