Advertisement

बालचित्रवाणीचे होणार विलीनीकरण


बालचित्रवाणीचे होणार विलीनीकरण
SHARES

मुंबई - गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बालचित्रवाणीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. एकेकाळी लहान मुलांच्या मनोरंजनाबरोबर शैक्षणिक प्रसाराचे कार्यक्रम सादर करणा-या बालचित्रवाणीचे बालभारतीमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  
‘आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दूरदर्शन वाहिनीवर चालत नाही. जे दुकान चालत नाही, ते दुकान चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही,’ अशी टिप्पणी करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी  राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच बालचित्रवाणी आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) मध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. आता बालभारतीची ई-लर्निंग शाखा म्हणून बालचित्रवाणी काम करणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा