एसटीचे मुंबईत लवकरच कॉल सेंटर

 Pali Hill
एसटीचे मुंबईत लवकरच कॉल सेंटर

मुंबई - एसटी प्रवाशांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी 24 तास कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या समस्या, तक्रारी मांडता याव्या यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणाराय. कॉल सेंटर सुरू करण्याच्या निर्णयासाठी दोन दिवसांपूर्वीच निविदा काढण्यात आल्यात, अशी माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मुंबई लाइव्हला दिली.

सध्या एसटीची 1800221250 या क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाईन सुरू आहे. पण त्याचा म्हणावा तसा वापर वा उपयोग होत नाहीय. त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटीनं कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहा महिन्यांत मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यांनं स्पष्ट केलं.

Loading Comments