Advertisement

वरळीतील 'एनएससीआय'मधील रोबोट रुग्णसेवेत

दक्षिण मुंबईच्या वरळी येथील 'एनएससीआय'मध्ये कोरोना रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर बनविण्यात आलं आहे.

वरळीतील 'एनएससीआय'मधील रोबोट रुग्णसेवेत
SHARES

दक्षिण मुंबईच्या वरळी येथील 'एनएससीआय'मध्ये कोरोना रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर बनविण्यात आलं आहे. या सेंटरमध्ये 'रोबोट 2.0' दाखल झाला असून, हा रोबोट रुग्णांपर्यंत अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवण्यासोबतच हा रोबोट रुग्णांचे पल्स ऑक्सीमीटरही चेक करणार आहे.

'रोबोट 2.0'मुळं वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार आहे. तसंच, या रोबोटमध्ये सेन्सर बसवण्यात आला आहे. या सेन्सरच्या आधारे तो रुग्णाच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजन पातळी आणि ईसीजी करणार आहे. विशेष म्हणजे रोबोटद्वारे डॉक्टर्स रुग्णांशी संवादही साधू शकणार आहेत.

या रोबोटमुळं डॉक्टरांचीही जोखीम कमी होणार असून कर्मचार्‍यांना पीपीई कीट घालून कराव्या लागणाऱ्या रूग्णसेवेचा ताणही कमी होणार आहे. जी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या सहकार्यानं हा रोबोट तयार करण्यात आला आहे. 



हेही वाचा -

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात

ई-पास बंदीसाठी हायकोर्टात जनहित याचिका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा