Advertisement

आता खात्याविना करता येणार फेसबुक लाईव्ह

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फेसबुकनं देखील आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे.

आता खात्याविना करता येणार फेसबुक लाईव्ह
SHARES

कोरोना व्हायरसमुळे लोक आपआपल्या घरात कैद आहेत. अशावेळी लोक इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मदतीनं आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स देखील आपल्या युजर्ससाठी या कठीण परिस्थितीत अनेक नवनवीन फीचर आणत आहे. फेसबुकनं देखील आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे.

आता ज्या लोकांचे फेसबुकवर अकाउंट नाही, अशांना देखील लाईव्ह करता येणार आहे. फेसबुकची ही सुविधा आधी डेस्कटॉप युजर्ससाठी होती. मात्र आता मोबाईल युजर्ससाठी देखील हे फीचर सुरू करण्यात आलं आहे.

नॉन फेसबुक युजर्ससाठी लाईव्हचे फीचर सध्या अँड्राईडवर उपलब्ध आहे. लवकरच आयओएस व्हर्जनसाठी देखील हे फीचर उपलब्ध होईल. या फीचर व्यतिरिक्त फेसबुक पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क फीचर आणण्याच्या तयारीत देखील आहे. यामध्ये युजर्स एका टोल फ्री नंबरद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये ऑडिओ ऐकू शकतात.



हेही वाचा

सरकार लवकरच आणणार 'कोरोना कवच' अ‍ॅप

लॉकडाऊनमुळे जगभरातली इंटरनेट सेवा कोलमडली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा