Advertisement

मद्य विक्री परवाने आता ऑनलाइन


मद्य विक्री परवाने आता ऑनलाइन
SHARES

मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मंगळवारी सुविधा अॅपचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे विविध परवाने आता ऑनलाइन मिळणार आहेत. तर तक्रार दाखल करण्यासाठी या अॅपची सेवा सुरु करण्यात आलीय. या वेळी उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ऑनलाइन सर्व्हिसचे संकेतस्थळ- www.stateexcise.maharashtra.gov.in आहे.

या अॅपच्या माध्यमातुन सर्व गैरव्यवहारांना चाप बसणार आहे. मद्य विक्रीचे परवाने, त्याचे शुल्क आणि कागदपत्रांची तपासणी ही आता ऑनलाइन पध्दतीनं होणार असून संपूर्ण प्रक्रियेला पारदर्शकता होणार आहे, तसंच भ्रष्टाचाराला कुठेही वाव राहणार नाही. यावर बीअर शॉपी, परमीट रुम, मद्य विक्रीचे परवाने ही ऑनलाइनच मिळणार आहे. तरी हा मोबाइल अॅप गुगल स्टोरवर Excise- complaints या नावाने डाउनलोड करता येतो. हा अॅप मंगळवारपासून सुरू करण्यात आलाय.

तरी तक्रारीसाठी टोल फ्री क्र.18008333333 आणि व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 असा आहे. यावर देखील संपर्क करु शकता असं उत्पादन शुल्क विभागानं सांगितलंय. मुख्यमंत्र्यानी या सुविधेचे अभिनंदन केले असून आता परवान्यांची प्रक्रिया देखील पारदर्शक होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

संबंधित विषय
Advertisement