Advertisement

इंस्टाग्राम डाऊन, महिनाभरात दुसऱ्यांदा सेवा ठप्प


इंस्टाग्राम डाऊन, महिनाभरात दुसऱ्यांदा सेवा ठप्प
SHARES

मेटा-मालकीचे फोटो-व्हिडिओ शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम डाउन झाल्याचे कळते. डाउनडिटेक्टरने देखील याची पुष्टी केली आहे.

रिपोर्टनुसार, 56 टक्के यूजर्सना इन्स्टाग्राम अॅपमध्ये समस्या येत आहेत, तर 23 टक्के यूजर्सना लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. 21 टक्के युजर्सनी सर्व्हर एररची तक्रार केली आहे.

इन्स्टाग्राम व्यतिरिक्त, अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी देखील आउटेजबद्दल तक्रार केली आहे. फेसबुक वापरकर्त्यांची टाइमलाइन रिफ्रेश होत नाही.

इंस्टाग्राम डाऊन झाल्यामुळे लोक ट्विटरवर मजेदार मीम्स शेअर करत आहेत. ट्विटरवर #instagramdown ट्रेंड करत आहे. यूजर्स अॅप पुन्हा पुन्हा ओपन करत आहेत पण इन्स्टाग्राम ओपन होत नाहीये. तसेच पेज रिफ्रेश होत नाही.

'सॉरी, फीड रिफ्रेश करू शकलो नाही' आणि 'काहीतरी चूक झाली' हे अॅप वापरणाऱ्या वापरकर्त्यांच्या स्क्रीनवर दाखवले जात आहेत.

Downdetector.com वर इंटरनेट आउटेजच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ट्विटरवर लोक आपल्या समस्या मांडत आहेत.

एका महिन्यात इंस्टाग्रामवरील हा दुसरा आउटेज आहे. याआधी गेल्या महिन्यात 21 मे रोजीही इन्स्टाग्राम अनेक तास ठप्प झाले होते.

इन्स्टाग्राममधील तांत्रिक दोषामुळे हे घडले. इन्स्टाग्रामच्या या बगमुळे जगभरातील 1,80,000 युजर्सची खाती प्रभावित झाली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा