नियम तुटेल, मेसेज वाजेल

    मुंबई  -  

    मुंबई - सिग्नल पडलाय. झेब्रा क्रॉसिंगमागे सगळे थांबलेत.. पण हे महाशय मात्र राजेशाही थाटात पुढे आलेत..वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन कधी आणि कसं करावं हे मुंबईकरांना सांगण्याची गरज नाही.. मात्र आता अशा महाशयांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभाग अद्ययावत साधनांसह सज्ज झालाय..तब्बल 4717 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मुंबईवर आणि अशा लोकांवर करडी नजर असणार आहे..मुंबईतील प्रत्येक सिग्नलवर CCTNS प्रणालीचे अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत..या कॅमेऱ्यांचं नियंत्रण ट्रॅफिक हेडक्वॉर्टर्समधील हवालदार करणार... तेथूनच नियम मोडणाऱ्यांचे फोटो घेतले जाणार...पुढच्या काही मिनिटांत संबंधिताच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर चलान आणि फोटो पाठवला जाईल...या मेसेजमध्ये तुम्ही कधी आणि कुठे नियम मोडला याची संपूर्ण माहिती असेल...वाहतूक विभागाचं तर फुलप्रूफ प्लॅनिंग आहे..त्यामुळं आता ट्रॅफिक हवालदार आहे की नाही हे बघण्यापेक्षा तुम्ही कोणता नियम तर मोडत नाही ना याची काळजी घ्या..नाहीतर मेसेज आलाच म्हणून समजा..

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.