आता नेट वापरा फुकटात

 Pali Hill
 आता नेट वापरा फुकटात

मुंबई - मुंबईकरांना आता फुकटात नेट वापरायला मिळणार आहे. मुंबईत लवकरच 1200 ठिकाणी हॉटस्पॉट उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. मुंबईतील कुठल्याही ठिकाणाहून नेटसर्फिंग करणे सोपे जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीसीटीव्ही कंट्रोल रुमचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्याबरोबरच रस्ता आणि सोसायट्यांमध्ये लागलेले सीसीटीव्ही सरकारी यंत्रणेसोबत जोडण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

मुंबईच्या विविध भागात 1200 हॉटस्पॉट सुरू करणे

29 हजार ग्रामपंचायती डिजिटल करणे

मोबाईलवरुनच पोलीस ठाण्यात तक्रार करणे

Loading Comments