आता पोलीस परवानग्या ऑनलाइन

 Mumbai
आता पोलीस परवानग्या ऑनलाइन

मुंबई - अनेकदा नागरिकांना तक्रारनिवारण, विविध परवानग्यांसाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र सगळ्या परवानग्या ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. त्यामुळे या सगळ्यांपासून आता नागरिकांची सुटका झालीय. https://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/ या संकेतस्थाळावर जाऊन नागरिक सहज परवानग्या घेऊ शकतील.

ध्वनिक्षेपक, मनोरंजनाचे कार्यक्रम, सभा, मिरवणुका, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, शास्त्र परवाना तसंच वर्तणूक आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आदींसाठी लागणारे पोलीस परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र आता आॅनलाइन देण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे नागरिकांचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

विशेष म्हणजे तात्पुरत्या परवानग्या लागणारे छोटेखानी कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा यासाठी यापुढे कोणत्याही पोलीस परवानगीची गरज लागणार नाही. मात्र सार्वजनिक जागेतील सभा, विवादास्पद कार्यक्रम आणि ध्वनिक्षेपकासाठी लागणाऱ्या पोलिसांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या ना हरकत परवानगी अजूनही बंधनकारक आहे.

Loading Comments