ई-पेमेंट द्वारे एयरपोर्ट पार्किंग


SHARE

मुंबई - एयरपोर्ट पार्किंग आता ई-पेमेंट द्वारे करता येणार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर भारतीय विमानतळ प्राधीकरणाने हा निर्णय घेतलाय. 29 नोव्हेंबर एअरपोर्ट परिसरातील कार पार्किंग ई-पेमेंट द्वारे करता येणार आहे. जुन्या 500-1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधीकरणानं सर्व एयरपोर्टवर डिजिटल पेमेंट करणाऱ्या मशिनची स्थापना केली. त्याच बरोबर डेबिट कार्ड, क्रेडि़ट कार्ड, ई-पेमेंट, पेटीएम, फ्रिचार्जवर देखील कार पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. 29 नोव्हेंबरनंतर सर्व एयरपोर्टवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या