Advertisement

जबरदस्त प्रतिसाद, जियो फोनची नोंदणी थांबवली


जबरदस्त प्रतिसाद, जियो फोनची नोंदणी थांबवली
SHARES

ग्राहकांनी दिलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ नये म्हणून रिलायन्स जियोने ‘जियो फोन’ या ४ जी फिचर फोनचे बुकींग थांबवले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर ‘उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद, लाखोजणांनी ‘जियो फोन’साठी नोेंदणी केली आहे. फोनसाठी ‘प्री बुकींग’ केव्हा सुरू होईल, याची माहिती लवकरच देण्यात येईल, असा संदेश झळकत आहे.

सप्टेंबर महिन्यात कंपनीला जितके फोन उपलब्ध होतील, तेवढ्याच ग्राहकांची नोंदणी कंपनीने केली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ‘जियो फोन’च्या वितरणाला सुरूवात होईल.

‘जियो फोन’साठी कंपनीने २४ ऑगस्ट रोजी ५.३० वाजता ऑफलाईन आणि ऑनलाईन बुकींग सुरू केली होती. पण नोंदणी सुरू होताच तासाभरात कंपनीची वेबसाईट क्रॅश झाली होती. या फिचर फोनच्या नोंदणीसाठी ग्राहकाला ५०० रुपये, तर फोनची डिलिव्हरी घेताना आणखी १ हजार रुपये भरायचे आहेत. हँडसेट ३६ महिने वापरून कंपनीला परत दिल्यास ग्राहकाला त्यांचे दीड हजार रुपये परत करण्यात येतील, असेही कंपनीने म्हटले आहे.

कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार ‘जियो फोन’च्या बुकींगला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण तात्पुरत्या स्वरूपात ही नोंदणी थांबवण्यात आली आहे. मात्र देशभरात पसरलेल्या ‘जियो स्टोअर’मध्येही बुकींग थांबवण्यात आली आहे किंवा नाही याची माहिती त्यांनी दिली नाही.

प्रत्येक आठवड्याला ५० लाख हँडसेट विकण्याची कंपनीची योजना असल्याचे वक्तव्य रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले होते.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा