रिलायन्सची 'व्हॉट्सअॅप' सुविधा

  Pali Hill
  रिलायन्सची 'व्हॉट्सअॅप' सुविधा
  मुंबई  -  

  मुंबई - वीजग्राहकांच्या तक्रारींचं लवकरात लवकर निवारण व्हावं यासाठी रिलायन्सने 'व्हॉट्सअॅप' सेवेला प्राधान्य दिलंय. ग्राहकांना याद्वारे ई-बिल, वीज बिलाची कॉपी अशा अनेक सुविधांचा लाभ घेता येईल. वीजग्राहकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या तक्रारींचं त्वरित निवारण करण्यासाठी डिजिटल सेवेत भर घालण्यात आली असून, उपनगरांतल्या तीस लाख ग्राहकांना या सेवेचा लाभ होईल, असा दावा करण्यात येत आहे. ९०२२८१३०३० हा क्रमांक व्हॉट्सअॅपमध्ये सेव्ह टाकताच, ग्राहक ई-बिलाची स्थिती, मीटरिंग आणि वीज बिलाची माहिती, वीज बिलाची कॉपी, तक्रार नोंद, ऑनलाइन नवीन वीज जोडणी आदी सेवांचा लाभ ग्राहकांना घेता येईल. ही सेवा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.