Advertisement

अफवा पसरवणाऱ्यांना ट्विटर देणार चेतावणी

कोणत्याही ट्विटमध्ये देण्यात आलेली माहिती चुकीची अथवा छेडछाड केलेली आहे, असं वाटल्यास ट्विटर ही कारवाई करेल.

अफवा पसरवणाऱ्यांना ट्विटर देणार चेतावणी
SHARES

हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्यांचा अधिक प्रसार होतो. सोशल मीडिया कंपन्या देखील अशा खोट्या बातम्या, हिंसा दर्शवणाऱ्या पोस्ट रोखण्यासाठी अनेक पाऊलं उचलतात. फेसबुक, व्हॉट्स अॅपनंतर आता मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं देखील एक खास फीचर सादर केलं आहे.

कधी होणार फिचर लाँच?

ट्विटरनं आणलेल्या या फिचरमुळे आता तुम्ही कोणत्याही एडिट केलेल्या फोटो अथवा व्हिडीओला रिट्विट करताना नक्कीच एक-दोन वेळा विचार कराल. कारण ट्विटरच त्याबद्दल तुम्हाला चेतावणी देणार आहे. हे फीचर ५ मार्च २०२० ला लाँच करण्यात येईल. त्यानंतर युजर्स या फिचरचा वापर करू शकतात.

तर ट्विटरवर येणार चेतावणी

ट्विटरनुसार, लवकरच प्लॅटफॉर्मवर ट्विटचं लेबलिंग केलं जाईल. याद्वारे मोडून तोडून माहितीचा प्रसार करणारी माहिती देण्यात येईल. सोबतच चुकीची माहिती देणारं ट्विट देखील हटवलं जाईल. सोबतच ट्विटरवर चुकीची माहिती देणाऱ्याला देखील चेतावणी देण्यात येईल. याचा उद्देश खोटी माहिती प्रसारित करणारे ट्विट रोखणं हा आहे.

कोणत्याही ट्विटमध्ये देण्यात आलेली माहिती चुकीची अथवा छेडछाड केलेली आहे, असं वाटल्यास ट्विटवर याबाबतची माहिती दिली जाईल. अशा ट्विटवर एक प्रकारचे टॅग लावले जातील. असं ट्विट लाईक अथवा रिट्विट करण्याआधी युजर्सला चेतावणी दिली जाईल.हेही वाचा

गुगल मॅप्सचे नवे फिचर, मॅप्सवर दिसणार हॉटेल, मेट्रोतील गर्दी

गुगलचं 'हे' अ‍ॅप टिकटॉकला देणार टक्कर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा