Advertisement

अखेर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी डार्क मोड लाँच

व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या ट्विटर अकाउंट आणि ब्लॉग पोस्टवरून डार्क मोड फीचर लाँच करण्याची माहिती दिली आहे.

अखेर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी डार्क मोड लाँच
SHARES

बीटा चाचणीच्या दीर्घ कालावधीनंतर अखेरीस व्हॉट्सअॅपनं (Whats App) अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (IOS)च्या सर्व वापरकर्त्यांसाठी डार्क मोड आणला आहे. डार्क मोडमध्ये चॅटिंग करताना डोळ्यांना त्रास होत नाही. व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या ट्विटर अकाउंट आणि ब्लॉग पोस्टवरून डार्क मोड फीचर लाँच करण्याची माहिती दिली आहे.


सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध

फेसबुकच्या मालकीचं इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅप बऱ्याच काळापासून दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमसाठी डार्क मोडची चाचणी घेतली जात होती. यावेळी त्याचे बीटा व्हर्जन अॅन्ड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्हीसाठी प्रसिद्ध केलं गेलं. आता हे सर्व वापरकर्त्यांसाठी बाजारात आणलं गेलं आहे.

कंपनीनं आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, डार्क मोड अशा प्रकारे डिझाइन केलं गेलं आहे की व्हॉट्सअॅपवर कमी प्रकाशातही चॅट केल्यानं डोळ्यावर ताण येणार नाही. फोन चालू होताच त्याच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण पडतो. अशा परिस्थितीतही वापरकर्त्यांना या डार्क मोडमुळे आराम मिळेल', अशी आशा कंपनीनं व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त, डार्क मोड फोनच्या स्क्रीनमधून उत्सर्जित होणारा प्रकाश देखील कमी करतो. ज्यामुळे फोनची बॅटरी देखील कमी खर्च होते.

डार्क मोड थीम व्हॉट्सअ‍ॅपवर अॅड्रॉइड आणि आयओएस दोन्ही फोनवर उपलब्ध आहे. आयफोन अॅपवर हे काळ्या रंगात आहे. तर अॅड्रॉईड वर याचा रंग गडद राखाडी आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर डार्क मोड व्हिडिओसह लाँच करत आहोत, "


डार्क मोड कसा सुरू कराल?

आपल्या फोनमध्ये डार्क मोड नसल्यास आपण गुगल प्ले स्टोर ( Google Play Store) आणि अॅप स्टोअर (App Store)वरून डाऊनलोड करू शकता. यानंतर जर आपल्याला डार्क मोड थीम दिसत नसेल तर अॅड्रॉईड पॅकेज (APK) या फाईल फॉरमॅटचा वापर करून तुम्ही डार्क मोड डाऊनलोड करू शकता

१) अॅड्रॉईड १० (Android 10), ओएस (OS) आणि आयओएस १३ (IOS), अॅड्रॉईड ९ (Android 9) आणि ओएस (OS) वापरकर्ते डार्क मोड कसं डाऊनलोड करतील.

२) सर्व प्रथम व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये (Setting) जावं.

३) त्यानंतर चॅटवर (chat) क्लिक करा

४) चॅटवर (Chat) क्लिक केल्यावर डिस्प्ले (Display) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

५) डिस्ल्पे वर क्लिक केल्यावर तुम्हाला थीम (Theam) हा पर्याय दिसेल

६) थीममध्येच तुम्हाला डार्क मोड (Dark Mode) थीम निवडा आणि लागू करा.  




हेही वाचा

Zomato आणि Swiggy वर सरकारची नजर

मुलांनो TikTok वर होताय 'आऊट ऑफ कंट्रोल', आता पालक करणार कंट्रोल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा