Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप डाऊन, सायबर हल्ला झाल्याच्या चर्चांना उधाण

व्हॉट्स अॅपच्या (WhatsApp)प्रायवसी सेंटिंगमध्ये काही तरी गडबड झाल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप डाऊन, सायबर हल्ला झाल्याच्या चर्चांना उधाण
SHARES

व्हॉट्सअ‍ॅपवर या मॅसेजिंग अ‍ॅपचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात होतो. कोटीच्या घरात व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते आहेत. पण सर्वांचं आवडत्या मॅसेजिंग अॅपच्या (WhatsApp)प्रायवसी सेंटिंगमध्ये काही तरी गडबड झाल्याची चर्चा आहे. कारण लोकांना त्यांचं स्टेटस, ऑनलाईन टायपिंग आणि लास्ट दिसत नसल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. यासोबतच सायबर हल्ला झाल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 

जगभरातील शेकडो वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवर या चॅट अ‍ॅपद्वारे तांत्रिक अडचणींचा सामना करत आहेत. अनेकांनी व्हॉट्सअॅपवर प्रायव्हसी सेटिंग्समध्ये बदल झाल्याचं नोंदवलं आहे. त्यामुळे त्यांचे लास्ट स्टेटस, ऑनलाईन टायमिंग दिसत नसल्याची तक्रारी अनेकांनी ट्विटरद्वारे केल्या आहेत. ट्विटरवर सध्या #whatsappdown नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. यात अनेकांनी व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये गडबड असल्याचं ट्विट केलं आहे. 

तर काहींनी तक्रार केली आहे की, ते प्रायवसी सेटिंगमध्ये जाऊन बदल करत आहेत. पण ते होत नाही आहेत. तुर्तास तरी हा प्रायवसी सेटिंगमधला एक बग असण्याची शक्यता असू शकते.  

जगातल्या इतर काही देशांमध्येही या APP ची फीचर्स गायब झाली आहेत. Last Seen, Online Status ही फीचर्स काम करत नसल्याचं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे. डाऊन डिटेक्टरवर आज WA डाऊन झाल्याचे सुमारे ४ हजार रिपोर्टस आले. ७३ टक्के लोकांना WA वापरताना फीचर्सच्या अडचणी येत आहेत. तर २४ टक्के लोकांना लास्ट सीन दिसत नाहीये असं डाऊन डिटेक्टरनं म्हटलं आहे. अनेक युजर्सना प्रायव्हसी सेटिंग्जचाही इश्यू येतो आहे.

तर सोशल मीडियाीवर व्हायरल होणाऱ्या मेसेजेसमध्ये सायबर हल्ला झाल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. पण सायबरह हल्ल्याा संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे कृपया सोशल मीडियावरील सायबर हल्ल्या संदर्भात येणाऱ्या अफवांचा विश्वास करू नका.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा