Advertisement

मुंबईतून स्वत:च्या जोखिमेवर करा विमानप्रवास!

'इन्स्ट्र्यूमेंट लँडिंग सिस्टम'चं अपग्रेडेशन करण्यासाठी ही यंत्रणा बंद करण्यात येणार आहे. हे अपग्रेडेशन गुरूवार १७ मे रोजी सुरू करण्यात आलं असून हे काम ५ जून २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. या कामामुळे सकाळी ११ ते रात्री ११ वाजेदरम्यान ही यंत्रणा पूर्णपणे बंद राहणार आहे.

मुंबईतून स्वत:च्या जोखिमेवर करा विमानप्रवास!
SHARES

तुम्ही मुंबई विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तयारी करत असाल, तर चारदा विचार करा. कारण विमानाचं टेकआॅफ आणि लँडिंगला मार्गदर्शन करणारं इन्स्ट्र्यूमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) तांत्रिक कारणांमुळे ५ जून २०१८ पर्यंत बंद राहणार असल्याने विमानाचं वेळापत्रक गडबडणार आहे.

कारण काय?

'इन्स्ट्र्यूमेंट लँडिंग सिस्टम'चं अपग्रेडेशन करण्यासाठी ही यंत्रणा बंद करण्यात येणार आहे. हे अपग्रेडेशन गुरूवार १७ मे रोजी सुरू करण्यात आलं असून हे काम ५ जून २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. या कामामुळे सकाळी ११ ते रात्री ११ वाजेदरम्यान ही यंत्रणा पूर्णपणे बंद राहणार आहे.

पर्यायी रन वे चा वापर

मुंबई विमानतळावरील वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळ परिसरात दृष्यमानता अर्थात व्हिजीबिलिटी २, ४०० मीटरपेक्षा कमी आल्यास रन वे १४ चा वापर करण्यात येईल. तर दृष्यमानता १२०० पेक्षा खाली आल्यास हा दुसरा रनवे देखील बंद करण्यात येईल.

विमानतळावर गर्दी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दिवसांमध्ये दृष्यमानता कमी होण्याची शक्यता कमी आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या मते, 'आयएलएस' बंद राहिल्यामुळे वाहतुकीला फटका बसणार नाही. तरीही गुरूवारी आणि शुक्रवारी विमानाला झालेल्या विलंबामुळे विमानतळावर चांगलीच गर्दी झाली होती.

हेही वाचा-

कोल्हापूर-मुंबई विमानाने करा स्वस्तात प्रवास

विमानतळावर औषधांच्या नावाखाली ड्रग्जची तस्करी

मुंबई विमानतळावर अडीच कोटींचं गोल्डबार जप्त, आरोपी फरार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा