'मरे' हार्बरचा मेगाब्लॉक तर, 'परे'चा जम्बोब्लॉक

 Mumbai
'मरे' हार्बरचा मेगाब्लॉक तर, 'परे'चा जम्बोब्लॉक

6 ऑगस्ट रोजी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.20 ते संध्याकाळी 4.20 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉक दरम्यान मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक सकाळी 10.59 ते संध्याकाळी 4.20 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील. ब्लॉकदरम्यान डाऊन जलद मार्गावरील गाड्या सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्या गंतव्या स्थानकावरून 15 मिनिटे उशिराने धावतील. 50104 रत्नागिरी-दादर पसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच धावणार असून तेथूनच त्या रत्नागिरीसाठी पुन्हा रवाना होतील.


हार्बर मार्ग

हार्बर रेल्वे मार्गावर नेरूळ ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.20 ते संध्याकाळी 4.20 या वेळेत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील नेरूळ ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11.01 ते दुपारी 4.26 वाजेपर्यंत बंद असणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11.04 ते दुपारी 4.04 वाजेपर्यंत नेरूळ ते पनवेल दरम्यान बंद असणार आहे. पनवेल ते अंधेरी दरम्यानची वाहतूक देखील बंद असणार आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटीएम ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येईल.


पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल. याचदरम्यान उपनगरीय मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.हेही वाचा

चाकरमान्यांचा गणेशोत्सव गाडीतच साजरा होणार?


Loading Comments