Advertisement

कोकणात जाणाऱ्या एसटीला अखेर मुहूर्त, आरक्षण सुरू

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्ट पासून एसटी बस नेहमीच्या बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

कोकणात जाणाऱ्या एसटीला अखेर मुहूर्त, आरक्षण सुरू
SHARES

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्ट पासून एसटी बस नेहमीच्या बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. या बसचं आगाऊ आरक्षण ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू होत असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब यांनी दिली आहे. (msrtc bus reservation starts for konkan ganeshotsav says maharashtra transport minister anil parab )

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR)च्या निर्देशानुसार स्थलांतरितांना नवीन ठिकाणी किमान १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारने कोकणात जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी सोडण्याची घोषणा न केल्याने चाकरमान्यांची मोठी अडचण झाली होती. कारण क्वारंटाईनच्या हिशोबानुसार त्यांना ७ आॅगस्टपर्यंत कोकणात पोहोचणं आवश्यक होतं. परंतु राज्य सरकारने एका बाजूला एसटी बस सोडण्याची घोषणा करतानाच क्वारंटाईनचा कालावधी कमी करत १४ दिवसांवरून १० दिवस केला आहे. ई-पासची अटही रद्द करण्यात आली आहे. चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे.

हेही वाचा - Ganesh Festival: गणेश मंडपासाठी यंदाही अर्ज करा, आशिष शेलारांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन

यासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासात सामाजिक अंतर राखून एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी घेऊन एसटी बस येत्या ५ ऑगस्टपासून १२ ऑगस्टपर्यंत सोडण्यात येणार आहेत. ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून या बसचं आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसंच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे ) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. तसंच, सदर बस या विनाथांबा असल्याने (नैसर्गिक विधी वगळून) शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त  कुठेही थांबणार नाहीत.

 या बरोबरच ग्रुप बुकिंग (गट आरक्षण) करणाऱ्या प्रतिनिधींनी जवळच्या आगारात आरक्षणासाठी संपर्क साधावा. त्यांना देखील केवळ २२ प्रवशांचे  नेहमीचे एकेरी तिकीट दर आकारुन त्यांच्या कोकणातील गावापर्यंत थेट बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असं एसटी प्रशासनाने कळविलं आहे.

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई-पास ची गरज नसून, प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संबंधित प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे (२३ऑगस्ट पासून येण्यासाठी)आगाऊ आरक्षण देखील करण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली.

हेही वाचा- Ganesh Festival 2020: चाकरमान्यांनो, गणेशोत्सवाला कोकणात जाऊ नका, जयराज साळगावकरांचं आवाहन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा