Advertisement

महापालिका आयुक्त म्हणाले, 'बेस्टला दमडीही देणार नाही'!


महापालिका आयुक्त म्हणाले, 'बेस्टला दमडीही देणार नाही'!
SHARES

बेस्ट उपक्रम तोट्यात असल्याने त्याला महापालिकेकडून आर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यातच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला एक पैसाही देता येणार नाही, असे महापालिका सभागृहात जाहीर केल्याने आर्थिक मदतीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. 

बेस्टला आर्थिक गाळातून बाहेर काढण्यासाठी पुढील पाच वर्षे बेस्टला सुमारे १० हजार कोटी रुपये देण्याची मागणी होत आहे. हे पैसे देऊन बेस्टच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, परंतु सेवेत कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे हे पैसे मला देता येणार नाही. तसे केल्यास मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांकरीता १० हजार कोटी रुपयांची तूट निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल, पण मी फुटी कवडीही देऊ शकत नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महापालिका सभागृहात चर्चा सुरू आहे. या चर्चेत आयुक्त अजोय मेहता यांनी निवेदन करत ही हतबलता व्यक्त केली. बेस्टचा नफा ५०० कोटी रुपयांचा असला तरी त्यात ३०० कोटींची तूट आहे, असे त्यांनी सांगितले.


ठेवींतून पैसे देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटींच्या ठेवी आहेत, त्यातून पुढील ५ वर्षे ९७०० कोटी रुपयांचा निधी बेस्टला देण्याची मागणी केली जात आहे. या मुदत ठेवींपैकी १८९७६ कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतनाची रक्षक तसेच कंत्राटदारांची अनामत रक्कम यातील आहे. यातून सुमारे ४२ कोटी रुपये शिल्लक राहतात.


प्रकल्पांना निधी अपुरा

त्यातच महापालिकेला मलजल शुद्धीकरण केंद्र, गोरेगाव- मुलुंड लिंक रोड, पाणी प्रकल्प, कोस्टल रोड आदींसाठी एकूण ५७८०० कोटींची गरज आहे. या प्रकल्पासाठी १६००० कोटी रुपयांची तूट महापालिकेला पडणार आहे. त्यामुळे बेस्टला १० हजार कोटी रुपये देणे योग्य होणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.


पाच वर्षांनंतरही तोटा होणार असेल तर...

बेस्टला ९७०० कोटी रुपये दिल्यास बेस्टची सेवा सुधारणार नाही. आता जो तोटा होत आहे, तो पाच वर्षांनंतरही होणार आहे. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक तुटीवर उपाय शोधायला हवा. शेअर टॅक्सी आणि रिक्षा सेवा बंद करण्यात यावी, अशी सूचना पुढे येत आहे. परंतु आपण स्पर्धेच्या युगात असल्याने शेअर रिक्षा, टॅक्सी साेबतच ओला, उबेरही रस्त्यांवर धावत असताना बेस्टला कसे पुढे नेता येईल, याचा विचार करायला हवा. बेस्ट बस वेळेवर धावणे, प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करणे हे दोन उपाय करावे लागतील, असे त्यांनी सांगितले.


छोट्या मार्गांवर तिकीट दरवाढ नको

तिकीट दरात वाढ करणे अपरिहार्यच राहील, परंतु जे छोटे बसमार्ग आहेत, त्यांचे तिकीट दर वाढवू नये. कारण बेस्टचे ७० ते ७५ टक्के प्रवासी छोट्या मार्गावरील आहेत. बेस्टने कामगारांना ज्या सेवा सुविधा दिल्या आहेत, त्याही बंद करणे गरजेचे असल्याचे मेहता यांनी सांगितले.



हे देखील वाचा -

 ट्रायमॅक्स मशिन्स बंद, छापील तिकिटेही अपुरी, बेस्ट पुढे कशी चालणार?

बेस्टला वाचवण्यासाठी टीसीच वाटतायत पत्रकं!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा