डाॅन मन्या सुर्वे नाना पाटेकर यांचा भाऊ, त्यांनीच सांगितलं

९०च्या दशकातला कुख्यात डाँन (Don) मन्या सुर्वे (Manya surve ) हा माझा भाऊ होता. तो माझ्या मामाचा मुलगा होता, असा खुला ज्येष्ठ अभिनेते (Actor) नाना पाटेकर (Nana patekar) यांनी केल्याने उपस्थितांच्या भूवया उंचावल्या, पिंपरी चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक कला  संस्थेच्या २१ व्या वर्धापन  दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाना बोलत होते. त्यावेळी नानांनी त्यांच्या खास शैलीत सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.

हेही वाचाः- तिसऱ्यांदा ‘सायबर महाराष्ट्र’च्या विभागणीचा प्रस्ताव गृहविभागाने फेटाळला

ऐकीकडे खासदार (Member of parliament) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकारण्यांचे कुख्यात गुंडांबरोबरच्या हितसंबधांना उजाळा दिल्यानंतर एकच वादंग निर्माण झाला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी तो मुद्दा उचलून धरल्यानंतर सर्वच स्तरावरून राऊत यांना लक्ष केले जात होते. त्या पाठोपाठ आता कलाकार आणि डाँन यांच्यातील संबध नानांच्या बोलण्यातून उघड झाले आहे. गुन्हेगारीशी संबधित भूमिकांवर बोलताना नानांनी डाँन मन्या सुर्वेंचा संदर्भ दिला. ९० च्या दशकातील कुख्यात डाँन मन्या सुर्वे याचे आणि माझे घरचे संबध होते. मन्या माझा मामाचा मुलगा होता. त्यामुळे तो माझा भाऊच असल्याचे स्पष्टीकरण नानांनी दिल्यानंतर उपस्थितांच्या भूवया उंचावल्या.

हेही वाचाः- ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला मनसेला आशीर्वाद, तुम्हीच ऐका, काय म्हणाले…

त्याच बरोबर नानांनी येरवडा जेल(Yerwada Jail)ला भेट दिली असताना. गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या  आरोपींची आठवण देखील उपस्थितांना सांगितली. येरवड्यात नानांनी ४५० कैद्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यावर बोलताना नाना म्हणाले की, ‘जन्मता कुणी ही आरोपी नसतो. परिस्थितीनुसार त्यांनी कायदा हातात घेतलेला असतो. त्या रागामुळे आयुष्यातला महत्वाचा काळ ते तुरुंगात घालवत असतात. त्यामुळे प्रत्येकाने तो रागाचा क्षण संभाळायला हवा असा सल्ला नानांनी उपस्थितांना दिला.  कलाकारांचं आयुष्य आणि त्यांतल्या अडचणी, समस्या यावर देखील नाना पाटेकर मुलाखतीत मनमोकळे पणानं बोलले.

हेही वाचाः- अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड

कोण होता मन्या सुर्वे

मनोहर अर्जुन सर्वे उर्फ मुंबईतला एकेकाळचा कुख्यात गुंड मन्या सुर्वे. दादरमधील कीर्ती कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या मन्या सुर्वेनं १९७०-८०दशकात मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला होता. दाऊद इब्राहिमला आव्हान देणारा डॉन म्हणून मन्या सुर्वेची ओळख निर्माण झाली होती. १० जानेवारी १९८० रोजी मुंबईतल्या आंबेडकर कॉलेज(Ambedkar College)बाहेरच्या ब्युटी पार्लरजवळ मन्या त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत आला होता.त्यावेळी मुंबई पोलिस दला (Mumbai police)तील पोलिस अधिकारी इसाक बागवान यांनी १९८२ मध्ये मन्याचा पहिला इन्काऊन्टर केला होता. 

हेही वाचाः- मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या सौंदर्य जतनासाठी २०० कोटींचा निधी

पुढील बातमी
इतर बातम्या