Advertisement

मराठीला पाठदुखीचा त्रास, महेश केळुसकरांचं मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांना जाहीर पत्र

दिब्रिटो यांच्या पाठदुखीचा संदर्भ घेऊन प्रसिद्ध कवी महेश केळुसकर यांनी मराठी भाषा आणि साहित्यला जडलेल्या पाठदुखीबद्दल काही मुद्दे अधोरेखित केले आहेत.

मराठीला पाठदुखीचा त्रास, महेश केळुसकरांचं मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांना जाहीर पत्र
SHARES

उस्मानाबाद इथं आयोजित करण्यात येत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून अध्यक्षीय भाषण करणार आहेत. दिब्रिटो यांच्या पाठदुखीचा संदर्भ घेऊन प्रसिद्ध कवी महेश केळुसकर यांनी मराठी भाषा आणि साहित्यला जडलेल्या पाठदुखीबद्दल काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. या मुद्द्यांचा आपल्या अध्यक्षीय भाषणात समावेश करण्याचं आवाहनही त्यांनी दिब्रिटो यांना केलं आहे.

हेही वाचा- 'या' दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन बंद

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने हे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिब्रिटो यांच्या नावाला विरोध असल्याने ज्येष्ठ साहित्यिक कवी ना. धों. महानोर यांनी संमेलनाला जाऊ नये, अशी धमकी त्यांना संमेलनाच्या पूर्वसंध्येला मिळाली होती. परंतु या धमकीला नजरेआड करत महानोर संमेलनात सहभागी झाले.

या सर्व पार्श्वभूमीवर केळुसकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर दिब्रिटो यांना उद्देशून एक जाहीर पत्र लिहिलं आहे. या पत्रात मराठी भाषा आणि साहित्याच्या भल्यासाठी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ठोस भूमिका मांडण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. या पत्रातील मुद्दे पुढीलप्रमाणे 


हेही वाचा- धमकी मिळूनही ना. धों. महानोर साहित्य समेंलनाला जाणार 

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा