Advertisement

जीओ मार्टनंतर ग्राहकांसाठी नवीन पर्याय, फ्लिपकार्ट होलसेल ऑगस्टमध्ये होणार लाँच

फ्लिपकार्ट ग्रुपनं वॉलमार्ट इंडिया प्राइवेट लिमिटेड (Walmart India Pvt Ltd) मध्ये १०० % भागधारीचे अधिग्रहण केलं आहे.

जीओ मार्टनंतर ग्राहकांसाठी नवीन पर्याय, फ्लिपकार्ट होलसेल ऑगस्टमध्ये होणार लाँच
SHARES

फ्लिपकार्ट ग्रृपनं (Flipkart) वॉलमार्ट इंडिया ताब्यात घेण्याची आणि फ्लिपकार्ट होलसेल या डिजिटल मार्केटप्लेसची घोषणा केली. ऑगस्ट महिन्यामध्ये फ्लिपकार्ट होलसेल (Flipkart Wholesale) लाँच करण्यात येणार आहे. फ्लिपकार्ट ग्रुपनं वॉलमार्ट इंडिया प्राइवेट लिमिटेड (Walmart India Pvt Ltd) मध्ये १०० % भागधारीचे अधिग्रहण केलं आहे.

फ्लिपकार्ट होलसेलच्या लाँचमुळे किराणा आणि MSME क्षेत्रासाठी प्रतिभा, मजबूत तंत्रज्ञान, व्यापार कौशल्य आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा घेता येईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. भारताच्या रिटेल इकोसिस्टममध्ये किरणा आणि एमएसएमई हे मध्यवर्ती आहेत. फ्लिपकार्ट होलसेल लहान व्यवसायांना महत्त्वपूर्ण मूल्य देऊन त्यांच्या गरजा भागवण्यावर भर देईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : पीएफमधून पैसे काढण्यासाठी कागदपत्रांची गरज नाही

फ्लिपकार्ट होलसेल किराणा आणि फॅशनमध्ये त्यांची सेवा पुरवणार आहे. रिलायन्स समूहानं रिलायन्स जिओमार्ट लाँच केल्याच्या काही महिन्यानंतर लगेचच फ्लिपकार्ट होलसेल लाँच करण्यात आलं आहे. उडान, मेट्रो कॅश, कॅरी आणि Amazonचे B2B डिव्हिजन हे फ्लिपकार्ट होलसेलचे सध्याचे देशातील स्पर्धत आहेत.

फ्लिपकार्टचे ज्येष्ठ अधिकारी आदर्श मेनन हे फ्लिपकार्ट होलसेलचे प्रमुख असतील. वालमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर अग्रवाल यांवा वॉलमार्टमध्ये नवीन भूमिका देण्यात येणार आहे. वॉलमार्ट इंडियाचे देशात दोन फुलफिलमेंट सेंटर्स व्यतिरिक्त २८ बेस्ट प्राइस स्टोअर्स आहेत. त्याचप्रमाणे १.५ दशलक्ष सदस्यांना सेवा देत आहेत.



हेही वाचा

मुकेश अंबानींची संपत्ती देशातील ९ राज्यांच्या जीडीपीइतकी

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा