Advertisement

नाईटलाइफला अल्प प्रतिसाद? पहाटेपर्यंत मद्यपान करू द्या...

मुंबईत नाईटलाइफ यशस्वी करायचं असल्यास पहाटे ३.३० वाजेपर्यंत मद्यपान करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ‘आहार’ (ahar organisation) या संघटनेने केली आहे.

नाईटलाइफला अल्प प्रतिसाद? पहाटेपर्यंत मद्यपान करू द्या...
SHARES
Advertisement

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांच्या संकल्पनेतील नाईटलाइफ मुंबईत सुरू झालं असलं, तरी अजून या नाईटलाइफला (night life in mumbai) म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे मुंबईत नाईटलाइफ यशस्वी करायचं असल्यास पहाटे ३.३० वाजेपर्यंत मद्यपान करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ‘आहार’ (ahar organisation) या संघटनेने केली आहे.  

राज्य मंत्रिमंडळाने (state cabinet) मान्यता दिल्यानंतर  २७ जानेवारीच्या रात्रीपासून हा प्रयोग मुंबईत सुरू करण्यात आला. या निर्णयानुसार रात्रीच्या वेळेतही शहरातील अनिवासी भागातील माॅल, हाॅटेल-रेस्टाॅरंट सुरू करण्यास मान्यता मिळाली. मात्र सरकारच्या या निर्णयाने मुंबईत मद्यसंस्कृतीला चालना मिळून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होईल, असा आरोप भाजप नेत्यांकडून (bjp) करण्यात आला होता. 

हेही वाचा- बालहट्ट पुरवण्यासाठीच ‘नाईटलाइफ’चा निर्णय?, प्रविण दरेकरांचा सवाल

त्यावर, दिवाळी आणि गणपती (diwali and ganeshostav) सणांच्या वेळी मुंबईकर रात्रभर फिरतच असतात. या निमित्ताने खरेदीही करतात. त्याच पद्धतीची मुंबईतली नाईटलाइफ असेल. या निर्णयामुळे अनेक ठिकाणी ३ शिफ्टमध्ये काम चालेल. रोजगारनिर्मिती आणि महसूल वाढवण्यासोबतच लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत केवळ अनिवासी भागातील दुकाने, हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि माॅल (hotel restaurant and malls) २४ तास सुरू ठेवता येणार आहे. तसंच हा निर्णय कुणासाठीही बंधनकारक असणार नाही. महसूलचे नियम बदलण्यात न आल्याने पब आणि बार रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील. मद्यविक्रीला कुठलीही मुभा देण्यात आलेली नाही, असा खुलासा आदित्य ठाकरे (aadity thackeray) यांनी केला होता. 

परंतु नाईटलाइफ (Night life in mumbai) सुरू करून महिना होत आला असला, तरी त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने आहार संघटनेने यावर आपलं मत मांडलं आहे. रात्री एक-दोन वाजता कोणी कपडे खरेदी करण्यासाठी किंवा केवळ खाण्यासाठी नाही, तर बहुतेकजण मनोरंजन करण्यासाठी बाहेर पडतील. खाण्यासह मद्यपानही करतील,  त्यामुळे सध्या रात्री १.३० पर्यंत मद्यमानास (liquor) असलेली मुभा वाढवून ३.३० पर्यंत वाढवायला हवी, असं आहार (ahar organisation) संघटनेचं म्हणणं आहे. सोबतच हार्ड लिकरची वयोमर्यादा २५ वरून २१ वर्षे करण्यात यावी, अशीही संघटनेची माहिती आहे.  

हेही वाचा- ‘नाईटलाइफ’मुळे वाढतील बलात्कार, राज पुरोहित यांचा दावा

 

संबंधित विषय
Advertisement