Advertisement

'मस्जिद बंदर येथे माथाडी भवन उभारा'


'मस्जिद बंदर येथे माथाडी भवन उभारा'
SHARES

मुंबई महापालिकेच्या वतीने माथाडी भवन बांधण्याचे जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात यासाठी यावर्षी कोणत्याही प्रकारची आर्थिक निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे मस्जिद बंदर येथे भव्य दिव्य माथाडी भवन उभारून त्यामध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी महापालिका अर्थसंकल्पीय भाषणात काँग्रेसच्या नगरसेविका सेानल जामसूतकर यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेचा सन 2017-18चा अर्थसंकल्प हा संशयांकीत, प्रश्नांकीत आणि मुंबईकरांची दिशाभूल करणारा तसेच फसवणूक करणारा असा असल्याचे सांगून सोनम जामसूतकर यांनी अर्थसंकल्पावर आपले विचार मांडले. ताडवाडी येथे महापालिकेच्या मालकीचा असलेल्या बीआयटी चाळींचा पुनर्विकास करतेवेळी वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंचे तात्पुरते पुनर्वसन हे एक ते दोन किलोमीटर परिसरातील महापालिकेच्या जागेवर संक्रमण शिबीर बांधून तिथे केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नगरसेवक निधीतून मूलभूत सेवा-सुविधा पुरवण्यात याव्यात आणि हा खर्च संबंधित विकासकाकडून वसूल करण्यात यावा, अशीही सूचना त्यांनी मांडली.


यामुळेच हँकॉक ब्रीजचे काम रखडले

हँकॉक ब्रीजचे काम हे दोन प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे रखडले आहे. त्यामुळे या प्रकरणात महापालिकेने लक्ष घालून तातडीने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणांसाठी एक लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. यावरूनच ज्येष्ठ नागरिकांबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे उघड होते. त्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी गळती आणि त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय तसेच अपुरा पाणीपुरवठा हा मुंबईकरांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत गळती शोधण्यासाठी हिलियम गॅसचा वापर करण्याचे तंत्र हे निश्चितच फायद्याचे ठरणारे आहे, अशी सूचना त्यांनी मांडली.



हेही वाचा -

कवडीमोल मजुरीवरही दरोडा


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा