Advertisement

दादरमध्ये रंगणार गोवा फेस्टिव्हल!


दादरमध्ये रंगणार गोवा फेस्टिव्हल!
SHARES

गोव्यातील संस्कृतीचं दर्शन, तेथील कलाकुसरीच्या वस्तूंची खरेदी आणि विविध प्रकारच्या माशांच्या पाककृतीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर दादरमध्ये नक्की या! कारण दादरच्या डॉ. अँटोनियो डिसिल्व्हा टेक्निकल हायस्कूल येथे गोवा फेस्टिव्हल रंगणार आहे. हा फेस्टिव्हल १० आणि ११ फेब्रुवारी असे दोन दिवस असेल.



गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगार निर्मिती आणि तेथील वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने आठव्या गोवा फेस्टिव्हलचं आयोजन आम्ही गोयंकार या संस्थेतर्फे करण्यात आलं आहे.


विविध कार्यक्रमांची रेलचेल

या महोत्सवात पन्नास स्टॉल्स असून हे स्टॉल्स दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले राहणार आहेत. यामध्ये विविध स्पर्धा, चर्चासत्र, संगीत आणि मनोरंजानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.


प्रवेश नि:शुल्क

या महोत्सवाचं उद्घाटन १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सामाजिक कार्यकर्त्या मंगल वागळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी सामाजिक सेवा संघाचे विद्यार्थी गणेश स्तोत्र आणि अथर्वशीर्षचं पठण करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोवा महोत्सवात रसिकांना निःशुल्क प्रवेश राहणार आहे.



यावेळी फळे आणि फळभाज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे स्वच्छ करावे? याचे मार्गदर्शन पिंकी खाबिया करणार आहेत. त्यानंतर कोंकणी बोलण्याची स्पर्धा, कोंकणी साहित्याचे गजली आणि गीता यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी काय?

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गुटगुटीत बालकांची स्पर्धा, पाकस्पर्धा, टॅलेंट स्पर्धा, संगीत कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा गोवा महोत्सवामध्ये भारती दानैत यांचे अॅक्युप्रेशर हे खास वैशिष्ट्य असणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा