Coronavirus cases in Maharashtra: 354Mumbai: 181Pune: 39Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 9Thane: 9Navi Mumbai: 8Ahmednagar: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 16Total Discharged: 41BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

'मल्हार' साठी 'नो स्किन कलर क्लोथ्स' प्लीज

सेंट झेविअर्सचा 'मल्हार' लवकरच रंगणार आहे. या फेस्टिव्हलचा फिवर दिसू लागला असतानाच, 'मल्हार' मध्ये काय नियम असतील? याबाबत सर्व कॉलेज तरुण-तरुणींमध्ये उत्सुकता आहे. यंदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 'नो स्कीन कलर क्लोथ्स' असा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार आता स्किन कलरचे कपडे घालून येण्यावर बंदी असेल. या नियमामुळे सर्व कॉलेज तरुण-तरुणींच्या भुवया उंचावल्या असून या निर्णयाबाबत सर्वचजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

'मल्हार' साठी 'नो स्किन कलर क्लोथ्स' प्लीज
SHARE

कॉलेज विश्वातील लोकप्रिय फेस्टिव्हलपैकी एक असलेला सेंट झेविअर्सचा 'मल्हार' लवकरच रंगणार आहे. या फेस्टिव्हलचा फिवर दिसू लागला असतानाच, 'मल्हार' मध्ये काय नियम असतील? याबाबत सर्व कॉलेज तरुण-तरुणींमध्ये उत्सुकता आहे.

यंदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 'नो स्कीन कलर क्लोथ्स' असा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार आता स्किन कलरचे कपडे घालून येण्यावर बंदी असेल. या नियमामुळे सर्व कॉलेज तरुण-तरुणींच्या भुवया उंचावल्या असून या निर्णयाबाबत सर्वचजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.


म्हणून हा नियम लागू

'मल्हार' फेस्टिव्हलच्या इव्हेंट्सप्रमाणे विविध नियमही चर्चेत असतात. नो स्किन कलरप्रमाणे काही वर्षांपूर्वी शॉर्ट कपड्यांवरही बंदी घालण्यात आली होती. दरवर्षी सुरक्षिततेच्या दृष्टीनं किंवा एखादी अनैतिक घटना घडली तरच अशाप्रकारचे नियम बनवण्यात येतात. मात्र नो स्किन कलर क्लोथ्स हा नियम कोणत्याही घटनेकडे पाहून केलेला नाही. बऱ्याचदा स्किन कलरच्या लेगिंग्ज किंवा ड्रेसमुळं अश्लीलतेकडे झुकण्याची शक्यता असल्यानं सभ्यता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी हा नियम यंदा लागू करण्यात येणार आहे.

नो स्कीन कलर हा नियम गेल्या तीन ते चार वर्षांपासून बनवण्यात येत असून हा नियम सुरक्षेसाठी बनवण्यात आला आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारचं अंगप्रदर्शन करणारे कपडेही फेस्टिवलमध्ये घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
- भुवन मुजुमदार, मल्हार आयोजक टीम


या गोष्टींना नो एंट्री

मल्हार फेस्टिवलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकू, ब्लेड, कात्री यांसारख्या धारदार वस्तू, काचेच्या बाटल्या, लायटर, काडेपेटी, मेणबत्ती यांसारखे ज्वलनशील पदार्थ, मद्य आणि अमली पदार्थांनाही नो एंट्री असणार आहे. धातूचे किंवा टोकेरी हँडल असणारे कंगवांनाही नो एंट्री असणार आहे.


हेही वाचा -

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

संबंधित विषय
ताज्या बातम्या