Advertisement

कुलगुरू निवडीसाठी 'तारीख पे तारीख'

मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होण्यास इच्छुक अनेकांचे अर्ज आल्याने या निवड प्रक्रियेला १३ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. मात्र अंतिम नावांची निवड १७ तारखेनंतरच होणार असल्याचं कळत आहे.

कुलगुरू निवडीसाठी 'तारीख पे तारीख'
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारात सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नसल्याने आणि विद्यार्थ्यांचा नवीन कुलगुरू निवडीसाठी दबाव वाढत चालल्याने विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होण्यास इच्छुक अनेकांचे अर्ज आल्याने या निवड प्रक्रियेला १३ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. मात्र अंतिम नावांची निवड १७ तारखेनंतरच होणार असल्याचं कळत आहे.


अंतिम ५ जणांची निवड

कुलगुरूपदासाठी एकूण ३२ जणांचे अर्ज विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १३ एप्रिलला मुंबईतील नरिमन पॉइंट येथील सिडको कार्यालयात ३२ जणांच्या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ एप्रिलला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे ३२ जणांपैकी निवड झालेल्या अंतिम ५ जणांची नावे पाठवण्यात येतील.

ही नावे राज्यपालांकडे गेल्यानंतर निवडक ५ उमेदवारांना मुलाखतीसाठी १६ किंवा १७ एप्रिलपर्यंत बोलविण्यात येईल. त्यानंतरच राज्यपाल मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंचं नाव निश्चित करून त्या बाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती राजभवनाकडून मिळाली आहे.


६ महिने उलटले

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची पदावरून हकालपट्टी केल्यानंतर नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी ६ महिन्यांपूर्वी डॉ. कस्तुरीरंगन यांची समिती नेमली होती. त्यामुळे ६ महिने उलटूनही विद्यापीठात अद्याप कुलगुरूंची निवड न झाल्याने विद्यार्थी कमालीचे नाराज झाले आहेत. आता या मुलाखातीनंतर बहुचर्चित व बहुप्रतिक्षित कुलगुरूपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



हेही वाचा-

कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू... विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई विद्यापीठाच्या विकासाचं ब्ल्यू प्रिंट २ पानांत कसं शक्य? माजी सिनेट सदस्याचा सवाल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा