Advertisement

दुसरी डेडलाईनही चुकली..!


दुसरी डेडलाईनही चुकली..!
SHARES

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी दिलेली दुसरी डेडलाईनही कुलगुरूंना पाळता आलेली नाही असं दिसतंय. या आधी रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी कुलपतींनी ३१ जुलै ही डेडलाईन दिली होती. 31 जुलैलाही निकाल न लागल्यामुळे डेडलाईन वाढवून 5 ऑगस्ट करण्यात आली. मात्र 5 ऑगस्टही ही वाढीव डेडलाईनही पाळणं कुलगुरूंना शक्य झालेलं नाही.

डेडलाईन एकीकडे जवळ येत असताना परिक्षा विभागाकडे मात्र जवळपास दोन लाख उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचं टेन्शन अद्याप कायम आहे. 31 जुलैपासून कासवाच्या गतीने निकाल लागायला सुरुवात झाली आहे. एकूण ४७७ निकालांपैकी शुक्रवारी रात्रीपर्यंत 265 निकालांची घोषणा करण्यात आली. मात्र तरीही 2 लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे आव्हान प्राध्यापकांसमोर आहे. यात प्रामुख्याने कॉमर्स आणि लॉच्या उत्तरपत्रिकांचा समावेश आहे. तब्बल 83 हजार उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन अजून करायचे बाकी आहे.

31 जुलैला निकाल जाहीर न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंची भेट घेतली असता 1 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर केले जातील, असे आश्वासन आता विद्यार्थी संघटनांना कुलगुरूंनी दिले. त्यामुळे या मुदतीत तरी हे निकाल जाहीर होतील का? याकडे आता सर्वांच लक्ष लागले आहे.


विद्यापीठाचा वाद सोशल मीडियावर

सुरुवातीपासूनच विद्यापीठात कुलगुरू मनमानी कारभार करतात, अशी ओरड सुरू आहे. कुलगुरूंनी ऑनलाईन असेसमेंटचा घाट घातला आणि त्यामुळे निकाल रखडले, अशी टीकाही होऊ लागली. कुलगुरूंच्या याच मनमानी कारभाराला कंटाळून अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख निरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. याआधी हातेकर यांनी विद्यापीठात सुरू असलेला मनमानी कारभार सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांसमोर आणला होता. माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालावरून विरोधकांच्या रडारवर असलेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची १५ ऑगस्टनंतर गच्छंती होणार असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

कुलगुरूंना पदावरून हटवण्याचे अधिकार सरकारला नसले, तरी देशमुख कुलगुरूपदी राहावेत, अशी सरकारची जराही इच्छा नसल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव १५ ऑगस्टनंतर कुलगुरूंवर कारवाई करतील, अशी माहिती 'मुंबई लाइव्ह'ला मिळाली आहे.



हेही वाचा

विद्यापीठ निकालांवरुन राज्यपाल विरूद्ध कुलगुरू?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा