Advertisement

'लॉ'च्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन होणार

'बार कौन्सिल ऑफ इंडिया'ने याबाबत सूचना जाहीर केल्या आहेत.

'लॉ'च्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन होणार
SHARES

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ इंडियानं (BCI) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील विविध महाविद्यालयांमध्ये 'लॉ'चा (Law Study) अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा द्यावी लागणार आहे. 'बार कौन्सिल ऑफ इंडिया'ने याबाबत सूचना जाहीर केल्या आहेत.

याशिवाय अंतिम वर्ष (Final Year Exam) वगळता इतर वर्षांची परीक्षा द्यावी लागणार नाही. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि परीक्षेशिवाय प्रमोट केलं जाणार आहे. पण अंतिम वर्षास ऑनलाईन परीक्षा बंधनकारक असेल.

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या पत्रकात नमुद करण्यात आलं आहे की, लॉच्या तीन; तसंच पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वगळून अन्य सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मागील वर्षाचे गुण, चालू वर्षाच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे प्रमोट केलं जाईल. कॉलेज सुरू झाल्यानंतर संस्थांची इच्छा असेल, तर ज्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम सत्र परीक्षा घेता येऊ शकेल. मात्र, यासाठी एक वेळेची विशिष्ट मर्यादा असेल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं की, विद्यार्थ्यांना मागील सत्रात मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे अंतिम वर्षाचा निकाल जाहीर केला जाईल. तथापि, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांना चांगले मार्क मिळणार नाहीत किंवा ते परीक्षेत यशस्वी होणार नाहीत, असे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा परीक्षा देऊ शकतात. त्या विद्यार्थ्यांना डिग्री पूर्ण होईपर्यंत एक संधी मिळेल. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच पदवी दिली जाईल.

राज्यस्तरीय समितीच्या अहवालानुसार, विद्यापीठे सुरू झाल्यावर जे लोक गुणांबाबत समाधानी नाहीत ते परीक्षेस येऊ शकतात. तीन किंवा पाच वर्षांचा अभ्यासक्रम करीत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत समाविष्ट होण्याचीही परवानगी दिली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

संबंधित संस्था किंवा विद्यापीठे अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत ऑनलाइन पद्धतींचा अवलंब करू शकतात. परीक्षा आयोजित करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ नये, असं देखील सांगण्यात आल आहे.



हेही वाचा

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनो घाबरू नका, तुमच्यासाठीही लवकरच योग्य निर्णय- उदय सामंत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा