मुंबईत अनुभवा कोकण-कोल्हापूर महोत्सव

मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर गेल्या १ वर्षात ९ मिसळ महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आता आराध्य फाउंडेशनने ५ दिवसांचा कोकण-कोल्हापूर महोत्सव आयोजित केलाय.

  • मुंबईत अनुभवा कोकण-कोल्हापूर महोत्सव
SHARE

कोल्हापूर आणि कोकण इथल्या खाद्य संस्कृतीमध्ये जमीन-आस्मानचा फरक आहे. असं असलं तरी तिथली खाद्यसंस्कृती खवय्यांना नेहमीच आकर्षित करत असते. मग तो तांबडा-पांढरा रस्सा असो किंवा कोकणातील गावरान चिकन. खवय्ये ते आवडीनं खातात. यावरूनच कोल्हापुरी आणि कोकणी खाद्यपदार्थांशी मुंबईकरांचे निर्माण झालेले नाते किती घट्ट आहे हे कळून येते. हे नाते अधिक घट्ट व्हावं आणि खास कोल्हापुरी चव मुंबईकरांना चाखता यावी यासाठी कोकण-कोल्हापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

महोत्सवाची खासियत

मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर गेल्या १ वर्षात ९ मिसळ महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आता आराध्य फाउंडेशनने ५ दिवसांचा कोकण-कोल्हापूर महोत्सव आयोजीत केलाय. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तुम्हाला एक से एक कोल्हापूरी आणि कोकणी पदार्थ चाखता येणार आहेत. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, मटण फ्राय, मटन चाप, मटण सुका, रक्ती मुंडी, अंडा खांडोळी, पिठलं भाकर, पैलवान कट वडा तर कोकणातील गावरान चिकन, कलेजी, वजरी, चिंबोरी मसाला, शिंपल्या, पापलेट फ्राय, बोंबील फ्राय याचा आस्वाद तुम्हाला या महोत्सवात घेता येणार आहे.


स्विट तो बनता है

आता हे चमचमीत खाऊन पोटोबा कितीही भरलेला का असेना पण स्विट डिश तो बनती है ना बॉस. इथं तर त्याचीही सोय केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे स्विट डिशमध्ये देखील एक-दोन नाही तर खूप व्हरायटी इथं चाखता येतील. अगदी वसईची फ्रोजन आईस्क्रीम, चेंबूरचा फालुदा, कुल्फी, मटका आईस्क्रीम, पेण-पनवेलचे खरवस, औरंगाबादचं फ्रुट सलाड, पुण्याचे सुप्रसिद्ध यश बर्फाचा गोळा, औरंगाबादचा साबीरभाई पानवाला, विरारच्या हरीश भाईचे मुखवास, पॉप कॉन कँडी, सोडा पब आणि बरचं काही खवय्यांना इथं खायला मिळणार आहे.


कधी : ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर 

कुठे : शहीद भगतसिंग मैदान, अभुद्य नगर, काळाचौकी

वेळ : संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंतहेही वाचा

मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव

मुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच


संबंधित विषय
ताज्या बातम्या