Advertisement

बर्गर आणि बिअर फेस्टिव्हलचा डबल धमाका


बर्गर आणि बिअर फेस्टिव्हलचा डबल धमाका
SHARES

हवामान, नैसर्गिक साधनसंपत्ती, प्रथा, परंपरा यातील वैविध्यामुळे वेगवेगळे पदार्थ तयार झाले आणि यातूनच खाद्यसंस्कृती उदयाला आली. दळणवळणाच्या साधनांचा विकास झाल्यानं माणसाच्या प्रवासाला मर्यादाच उरल्या नाहीत. त्यामुळे जग जवळ आलं. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासानंतर तर जग म्हणजे एक खेडं बनलंया सगळ्यामुळे माणसाला वेगवेगळ्या संस्कृती अनुभवता येऊ लागल्या. ठिकठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा परिचय आपल्याला झाला.  बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळेच परदेशातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅफे आपल्याकडे सुरू झाली. खवय्यांना आकर्षित करण्यासाठी या हॉटेल्स मालकांनी वेगवेगळे खाद्यमहोत्सव आयोजीत केले. या खाद्यमहोत्सवामध्ये आपण एकाच ठिकाणी जगातील वेगवेगळ्या भागांतील पदार्थ चाखू शकतो. असाच एक हटके महोत्सव मुंबईत आयोजीत करण्यात आला आहे


बर्गर आणि बिअर हे दोन पदार्थ बाहेरच्या देशातूनच भारतात आले. पण बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे भारतियांनी याला आपलंसं केलं आहे. आपल्यापैकी अनेकांना बर्गर आवडतं तर काहींना बिअर. त्यामुळंच बिअर आणि बर्गर शौकिनांसाठी मुंबईत 'बर्गर आणि बिअर फेस्टिव्हल'चं आयोजन केलं आहे


कॉम्बो फेस्टिव्हल

कुलाबा आणि अंधेरी इथल्या 'वुडसाईट इन' या रेस्टॉरंटनं बर्गर आणि बिअरचं हटके फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. वुडसाईड इन्सचं हे ११ वे पर्व आहे. या फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून १२ ऑगस्टपर्यंत तुम्ही याचा आनंद घेऊ शकता


या फेस्टिव्हलला तुम्ही फक्त बिअरच नाही तर त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्गरचा आस्वाद घेऊ शकता. असे बर्गर जे तुम्ही कधी ट्राय केली नसतील. यासोबतच क्राफ्ट बिअर या फेस्टिव्हलची खासियत आहे. यासाठी वुडसाईड इन्सनं गेटवे ब्रुईंग कंपनीसोबत हातमिळवणी केली आहेबर्गरची खासियत

बिअर आणि बर्गर फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला ११ प्रकारचे हटके बर्गर ट्राय करायला मिळणार आहेत. चायनात प्रसिद्ध असा तोफू इन सिचूआन हा बर्गर तुम्ही इथं खाऊ शकतायामध्ये राईस, नूडल्सकच्च्या कैरीचे स्लाईस, चारकोल याचा समावेश आहे.  


साऊथ कोरीयातल्या बुसान इथला सोया आणि ब्लॅक बिन पॅटी बर्गर आणि मशरुम्स यापासून बनलेला बर्गर नक्की ट्राय करा. कॅरीबिअन, युरोप, स्पेन, रशियाआफ्रिका आणि पाँडेचरी या देशांमधील बर्गर देखील या फेस्टिव्हलचं आकर्षण ठरत आहेत

एवढे झणझणीत बर्गर खाल्ल्यानंतर काही तरी गोड देखील पाहिजेच. मग तुमच्यासाठी पोलंडमध्ये अधिक खाल्ला जाणारा डिजर्ट बर्गर देखील आहे.

कुठे : वुडसाईड इन्स

अंधेरी : न्यू लिंक प्लाझा, ओशिवरा लिंक रोड, ओशिवरा पोलिस स्टेशनच्या जवळ, अंधेरी (प.)   

कुलाबा : वोडहाऊस रोड, रिगल सिनेमाच्या समोर, कोलाबा

कधी - १२ ऑगस्टपर्यंत हेही वाचा

बिअर प्रेमींसाठी अाॅलिम्पिक, बिअर प्या आणि खेळा
संबंधित विषय
Advertisement