Advertisement

फराळ खाऊन वजन वाढलंय? 'असं' करा कमी!


फराळ खाऊन वजन वाढलंय? 'असं' करा कमी!
SHARES

दिवाळीत फराळ, मिठाई अशा गोड आणि तेलकट, तुपकट पदार्थांवर सर्वांनीच ताव मारला असेल यात काही शंका नाही. पर 'हर चीज का हिसाब देना पडता है'. तसंच काहीसं सर्वांच्याच बाबतीत झालं असेल. जेवढं अरबट-चरबट खालंय त्याचा हिशोब आता तुमच्या शरीराला द्यावा लागणार. तेलकट पदार्थ खाऊन जळजळ, पित्ताचा त्रास तसंच मळमळल्यासारखं वाटत असेल. त्यामुळे आता तुम्हाला खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मुंबई लाइव्हच्या वाचकांसाठी अशाच काही टिप्स.


१) पाणी



फिट आणि फाईन राहण्यासाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून ८-१२ ग्लास किंवा दोन-तीन लिटर पाणी प्यायला हवे. पाणी गटागटा न पिता हळूहळू सावकाश एक-एक घोट प्या. पाण्याच्या डाएटमुळे वजन आटोक्यात येतं. तसंच तुमची पचनक्रिया सुधारते.


२) लेमन वॉटर



वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हे अत्यंत गुणकारी आहे. लिंबू पाणी पिताना त्यात साखर न टाकता पिणं फायदेशीर ठरेल. कमी कॅलरीजचे पाणी पिताना शरीराला उर्जा मिळते. रोज सकाळी एक ग्लास विंबू पाणी प्या. दिवाळीत वाढलेले तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.


३) फळं



फळांचं ज्यूस करून पिण्यापेक्षा फळं खावीत. फळ खाल्ल्यानं तुम्हाला जीवनसत्व, खनिजतत्व, फायबर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मिळतात. जेवणानंतर तात्काळ फळांचं सेवन करू नये. जेवणानंतर ३-४ तासानंतर फळांचं सेवन करावं. रात्रीला फळांचं सेवन करणं टाळावं. मधल्या वेळेत अरबट-चरबट खाण्यापेक्षा एक फळ खावं. जेणेकरून तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.


४) कडधान्य



कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी१ असतात. यासोबतच लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर युद्धा उपलब्ध असतात. कडधान्यांमध्ये ३५-४൦ टक्के प्रोटीन असते. दिवाळीत तेलकट-तुपकट खाल्ल्यानं शरीरात प्रोटीन्सची कमतरता निर्माण होते. यासाठी कडधान्य खाऊन ती कमतरता तुम्ही भरून काढू शकता.


५) काकडी



काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरातील विषारी आणि अनुपयोगी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते. काकडीत कॅलरी कमी आणि फायबर अधिक असते. त्यामुळे भूक लागल्यावर काकडी खाल्यानं पोट जास्त वेळ भरलेले असते. काकडीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा