Advertisement

महाराष्ट्राच्या पारंपरिक मिसळला मॅक्सीकन तडका

कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, वऱ्हाडी मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक मिसळ खवय्यांच्या अधिक पसंतीस उतरतात. पण बदलत्या खाद्यसंस्कृतीनुसार मिसळ या मेन्यूत आणखी काही फ्लेवर्स देखीव समाविष्ट करण्यात आले.

महाराष्ट्राच्या पारंपरिक मिसळला मॅक्सीकन तडका
SHARES

मोड आलेली मटकी किंवा वाटाण्याची उसळ... लालबुंद रश्शाचा तवंग मिरवणारी खमंग तर्री... त्यावर फरसाण आणि ऐसपैस ट्रेच्या प्लेटमध्ये जिभेला खुणावणारे मिश्रण म्हणजेच कांदा, कोथिंबीर आणि पावाची लुसलुशीत लादी...आहाहा... तरतरी आणणारी झणझणीत आणि घाम फोडणारी चवदार मिसळ! महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीची ओळख जपणारी ही मिसळ चाखायला कुणाला नाही आवडणार


मिसळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पारंपरिक अशी मिसळ येते. कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, वऱ्हाडी मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक मिसळ खवय्यांच्या अधिक पसंतीस उतरतात. पण बदलत्या खाद्य संस्कृतीनुसार मिसळ या मेन्यूत आणखी काही फ्लेवर्स देखील समाविष्ट करण्यात आले. मिसळ पेरी पेरी, पाणी पुरी मिसळ, शेजवान मिसळ अशा वेगवेगळ्या फ्लेवर्स काही महिन्यांपूर्वी दादरच्या 'हाऊस ऑफ मिसळ'नं खवय्यांसाठी सादर केल्या. आता यात आणखी दोन प्रकारच्या मिसळींचा समावेश करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक आहे मनचुरीयन मिसळ आणि दुसरी आहे मॅक्सीकन मिसळ...


मिसळीला मनचुरीयन तडका

मिसळ म्हटलं की त्यात मटकी, लालभडर तर्री, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर हे आलंच. मिसळ परिपूर्ण होण्यासाठी जे काही आपण त्यात टाकतो तेच या दोन नवीन फ्लेवर्सच्या मिसळमध्ये देखील असणार. मग तुम्ही म्हणाल यात काय वेगळेपणा आहे? यात वेगळेपणा म्हणजे त्यात टाकला जाणारा मसाला आणि त्याला सादर करण्याची पद्धत. हेच तर याचं वेगळेपण आहे

मनचुरीयन मिसळमध्ये देखील तुम्हाला मनचुरीयन बॉल्स आणि मिसळ हे असं कॉम्बिनेशन चाखायला मिळेल. मिसळच्या तर्रीमध्येच मनचुरीयन बॉल्स असतील आणि त्यासोबत पाव. मिसळमध्ये वापरण्यात येणारा मनचुरीयन मसाला त्यांनी स्वतबनवला आहेइथं मिळतात १८ प्रकारच्या मिसळ, म्हणून हे आहे 'हाऊस ऑफ मिसळ'मेक्सीकन मिसळ

मेक्सीकन आणि मिसळ हे कॉम्बिनेशन जरा विचित्रच आहे. पण मेक्सीकनला महाराष्ट्रीयन तडका देत एक हटके मिसळ खवय्यांसाठी सादर केली आहे. मेक्सीकन मिसळचा मसाला देखील त्यांनी स्वत: तयार केला आहे. मेक्सीकन मिसळसोबत पाव तर असतोच पण तुम्हाला नाचोस देखील देण्यात येतात

तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. मग लवकरात लवकर या मिसळ ट्राय करा. जर ट्राय केल्यात तर मिसळ आवडली की नाही हे नक्की कळवा.


कुठे : पत्ता : द हाऊस ऑफ मिसळ, प्लाजा थिएटरजवळ, दादर (.)

संपर्क : 093721 66413हेही वाचा -

पावसाळ्यात 'हे' पदार्थ एकदा तरी ट्राय कराच

खिचडी १ फ्लेवर्स १०१
संबंधित विषय
Advertisement