१२ झणझणीत मिसळींची चव चाखा पार्ल्यातील ‘मिसळोत्सवात’!

मुंबईत दोन दिवसांच्या 'मिसळोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे. ९ आणि १० डिसेंबरला आयोजित मिसळोत्सवात १२ प्रकारच्या मिसळीची चव चाखता येणार आहे.

SHARE

मोड आलेली मटकी, वाटाण्याची उसळ, थोडंसं फरसाण, झणझणीत अशी तर्री, त्यावर भुरभुरलेला कांदा, शेव आणि कोथिंबीर आणि सोबतीला पाव... आहाहा... या वर्णनानं तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल? महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीची ओळख जपणारी ही मिसळ मस्त थंडीच्या मोसमात गरमा-गरम चाखायला कुणाला नाही आवडणार? महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारे बनणाऱ्या या मिसळीचा आस्वाद तुम्हाला एकाच छताखाली चाखता येणार आहे, तेही मुंबईत.झणझणीत मिसळीचा घ्या आस्वाद

मुंबईत दोन दिवसांच्या 'मिसळोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे. ९ आणि १० डिसेंबरला आयोजित मिसळोत्सवात १२ प्रकारच्या मिसळीची चव चाखता येणार आहे. विलेपार्ले इथल्या 'लोकमान्य सेवा संघा'च्या स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगणात संध्याकाळी ४ ते ९ दरम्यान हा 'मिसळोत्सव' रंगणार आहे. प्रत्येक भागातील मिसळीला स्वत:चा स्वाद आणि रंग असतो. पुणे असो या सातारा, कोल्हापूर असो वा नाशिक... खमंग अशी मिसळ पावासोबत खाण्याची पद्धत आजही लोकप्रिय आहे. मुंबईतही मिसळीवर ताव मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईच्या परळ, लालबाग, नायगाव, दादर, दिरगाव, लोअर परळ भागात लज्जतदार मिसळ मिळते. ठाण्याची मामलेदार मिसळही तशी फेमस आहे. मुंबय्या स्टाईल मिसळ आपण खातोच. पण पुणेरी, कोल्हापूर, सातारा अशा भागातील मिसळ चाखण्यासाठी आपल्याला तिकडेच जावं लागतं. पण आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळींचा आस्वाद तुम्हाला एका छताखाली घेता येणार आहे. 


ठाणे, डोंबिवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, वाई, संगमेश्वर इथल्या ख्यातनाम मिसळीची चव चाखणं ही प्रत्येकांची इच्छा असते. पण फक्त मिसळ खाण्यासाठी लांबचा प्रवास करणं कुणालाच शक्य नसतं. म्हणूनच आम्ही १२ ते १५ प्रकारच्या मिसळीला खवय्यांच्या भेटीसाठी घेऊन यायचं ठरवलं. पेणचा तांडेल मिसळवाला असो वा संगमेशवरचा मुले मिसळ असो, या सर्वच मिसळ विक्रेत्यांनी या महोत्सवात सहभागी होण्याचं कबूल केलं आहे, अशी माहिती मिसळोत्सवाच्या आयोजकांनी दिली.  


कुठे होणार महोत्सव?

सावरकर पटांगण, टिळक मंदिरजवळ, विलेपार्ले  त्यामुळे हा 'मिसळोत्सव' खवय्यांसाठी एक वर्णनीच आहे. तुम्हालासुद्धा वेगवेगळ्या राज्यातील मिसळींची चव चाखायची असल्यास या महोत्सवाला नक्कीच भेट द्या आणि झणझणीत, तर्रीबाज १२ प्रकारच्या मिसळींचा आस्वाद घ्या.हेही वाचा

बर्गरपेक्षा समोसा हेल्दी! नव्या सर्वेक्षणातील निष्कर्ष!

संबंधित विषय
ताज्या बातम्या