Advertisement

पाणीपुरीचा आईस्क्रिम डोस

मीरा रोड इथल्या पार्लरमध्ये आईस्क्रीम आणि पाणीपुरी या दोन विरोधी टोकाच्या पदार्थांना एकत्र करून दाखवायची किमया करण्यात आली आहे.

पाणीपुरीचा आईस्क्रिम डोस
SHARES

आईस्क्रीम आपण सर्वच आवडीनं खातो. बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आईस्क्रीम हा सर्वांचाच विक पॉईंट. आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारची आईस्क्रीम खाल्ली असतील. पण तुम्ही कधी पाणीपुरी आईस्क्रीम खाल्लं आहे का? आईस्क्रीम आणि पाणीपुरी हे कॉम्बिनेशन कसं शक्य आहे? असलं तरी मिळतं कुठे? वगैरे वगैरे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. पण तुमच्या प्रश्नांचं एकच उत्तर ते म्हणजे मीरा रोडमध्ये असणारं आईस्क्रीम पार्लर.


अशी बनते पाणीपुरी आईस्क्रीम

मीरा रोड इथल्या 'गो पुओर नॅचरल आईस्क्रीम' पार्लरमध्ये आईस्क्रीम आणि पाणीपुरी या दोन विरोधी टोकाच्या पदार्थांना एकत्र करून दाखवायची किमया करण्यात आली आहे. पाणीपुरीची पुरी घ्यायची. पुरीत राहिल एवढंच आईस्क्रीम त्यात टाकायचं. त्यावर थोडं क्रिम टाकलं जातं आणि शेवटी वेगवेगळ्या रंगाच्या स्प्रिंकल्स. असी तयार होते तुमची आईस्क्रीम पाणीपुरी.


फ्लेवर्सचा तडका

सर्वात महत्त्वाचं हव्या त्या फ्लेवरमध्ये तुम्ही पाणीपुरी आईस्क्रीमचा स्वाद घेऊ शकता. ते त्यांचे स्वत:चे फ्लेवर्स तयार करतात. जांभूळ, चिंच असे वेगवेगळे फ्लेवर्स बनवतात. पण सर्वात जास्त पसंती बेल्जियम डार्क चॉकलेट दिली जाते. सो तुम्हाला देखील पाणीपुरी आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या गो पुओर नॅचरल आईस्क्रीम पार्लरला.

कुठे : गो पुओर नॅचरल आईस्क्रीम, 4, जनगीड अॅरकेडिआ, भैरव रेसिडंसीजवळ, बेवरली पार्क, मीरा रोड

वेळ : दुपारी १२ ते रात्री १.३०


हेही वाचा -

२ मिनिट्स मॅगीचे ३० प्रकार

'इथं' मिळत फक्त १० रुपयात जेवण
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा