Advertisement

घरच्या घरी ट्राय करा या ७ भन्नाट बीअर कॉकटेल्स

बीअरचं नाव घेताच अनेक जण नाकं मुरडतात. पण बीअरच्या याच कडवट चवीला थोडासा ट्विस्ट देत बीअर कॉकटेल हा पर्याय उपलब्ध झाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बीअर कॉकटेल्सची माहिती देणार आहोत. जे तुम्ही घरी देखील बनवू शकता.

घरच्या घरी ट्राय करा या ७ भन्नाट बीअर कॉकटेल्स
SHARES

व्होडकामध्ये शहाळ्याचं पाणी घातलं तर मस्तच. पार्टीजमध्ये बरेच जण याप्रकारे व्होडका पितात. नीरा आणि व्होडका असं कॉम्बिनेशन करून स्वत:ची स्टाइल निर्माण करता येते. काही जण (विशेषत: स्त्रिया) त्यात ऑरेंज ज्युस घालतात. व्होडका वा जिन ही व्हाइट ड्रिंक्स ज्यात मिसळाल, तशी दिसतात. त्यामुळे सध्या व्होडका हे व्हाइट ड्रिंक खूप पॉप्युलर होत आहे.

आता हे तर व्होडकाबद्दल झालं. तुम्ही बीअर कॉकटेल देखील ट्राय करू शकता. बीअर तशी चवीला थोडीशी कडवट असते. पण पिणारे आवडीनं पितात. काहींना बीअरचा कडवटपणा आवडत नाही. त्यामुळे बीअरचं नाव घेताच अनेक जण नाकं मुरडतात. पण बीअरच्या याच कडवट चवीला थोडासा ट्विस्ट देत बीअर कॉकटेल हा पर्याय उपलब्ध झाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बीअर कॉकटेल्सची माहिती देणार आहोत. जे तुम्ही घरी देखील बनवू शकता.

बीअरमध्ये मिक्स करण्यासाठी लागणारे हार्ड ड्रिंक मोजण्यासाठी 'पेग मेजरर' ची आवश्यक्ता असते. पेग मेजरर विकत घेतलंत की तुम्ही योग्य प्रमाणात त्यात हार्ड ड्रिंक मिक्स करू शकता.    ) माँक किंग

काय लागेल?

 • पाईंट ऑफ किंगफिशर 
 • ६० मिलीलीटर ओल्ड मंक 


कशी बनवाल?

माँक किंग या बीअर कॉकटेलमध्ये दोन देसी फ्लेवर्सचे ड्रिंक मिक्स करतात. एका ग्लासात ६० मिलीलीटर ओल्ड मंक घ्या. त्यात एक पाईंट बीअर मिक्स करा आणि बर्फाचे काही तुकडे टाकले की तुम्ही थंडगार बीअर ट्राय करू शकता


) शँडी


काय लागेल?

 • ६० मिली किंगफिशर
 • ३०० मिली स्प्राईट/७ अप


कसे बनवाल?

एका ग्लासात थंडगार ६० मिली किंगफिशर आणि ३०० मिली स्प्राईट मिक्स करा आणि सर्व्ह कराप्रकृतीसाठी बीअरचे फायदे) टकिला किंग

काय लागेल?

 • किंगफिशर पाईंट 
 • २ लिंबाचा रस
 • १ चमचा मीठ
 • ६० मिली टकिला


कसे बनवाल?

दोन्ही लिंबाचा रस एका ग्लासात घेतल्यावर त्यात १ चमचा मीठ टाका आणि नीट ढवळा. त्यात टकिला मिक्स करा आणि पुन्हा एकदा ढवळा. पूर्ण ग्लास किंगफिशरनं भरा आणि त्यात बर्फ टाकून थंडगार सर्व्ह करा.


) बॉईल मेकर


काय लागेल?

 • १ पाईंट किंगफिशर
 • ६० मिली व्हिस्की


कसे बनवाल?

जगातील उत्कृष्ट कॉकटेलमध्ये बॉईल मेकरचं नाव घेता येईल. छोट्या ग्लासमध्ये व्हिस्की घ्या. व्हिस्कीचा ग्लास बीअरच्या ग्लासात टाका. क्षणाचाही विलंब न करता हे बीअर कॉकटेल एका झटक्यात संपवायचं.


) बीअर पंच


काय लागेल?

 • .२ लीटर किंगफिशर
 • ७०० मिली द्राक्षाचा रस
 • /४ कप लिंबाचा रस 
 • २ कप साखर
 • ६ कप संत्र्याचा रस
 • ३६० मिली सोडा
 • बर्फ


कसे बनवाल?

एका भांड्यात द्राक्षाचा रस, लिंबाचा रस, साखर आणि संत्र्याचा रस मिक्स करा. त्यात सोडा आणि बिअर घाला. हे कॉकटेल ४ जणांना पुरेसं आहे.


) बीअर शँपेन

काय लागेल?

 • ६० मिली बीअर
 • ६० मिली शँपेन


कसे बनवाल?

बीअर पिण्याचा हा एक शानदार मार्ग आहे. ६० मिली बीअर ६० मिली शँपेन ग्लासमध्ये मिक्स करा आणि या कॉकटेलचा आस्वाद घ्या.


) वोडका-बीअर जिन फिज

काय लागेल?

 • १ पाईंट किंगफिशर
 • ४० मिली जिन
 • १० मिली वोडका


कसे बनवाल?

तिन्ही ड्रिक्स मिक्स करावेत आणि थंडगार सर्व्ह करावेत.


आहेत की नाही घरच्या घरी बीअर कॉकटेल्स बनवण्याच्या सोप्या टिप्स. २ ऑगस्ट बीअर डे आहे मग होऊन जाऊ दे त्यादिवशी काही तरी भन्नाट आणि तेही घरच्या घरी.हेही वाचा

बिअरला कॉकटेलचा तडका, हे पिऊन तुम्ही विसराल वोडका!

मुंबईत इथे मिळेल स्पेशल बीअर ट्रीट!

   

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा