Advertisement

बिअरला कॉकटेलचा तडका, हे पिऊन तुम्ही विसराल वोडका!

३ ऑगस्ट हा इंटरनॅशनल बिअर डे... या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी बिअरचं नवीन व्हर्जन घेऊन आलो आहोत.

बिअरला कॉकटेलचा तडका, हे पिऊन तुम्ही विसराल वोडका!
SHARES

बिअर म्हटलं की चवीला थोडीशी कडवट... पण पिणारे आवडीनं पितात. मात्र आपल्यापैकी काही जणांना बिअरचा हाच कडवटपणा आवडत नाही. त्यामुळे बिअरचं नाव घेताच अनेक जण नाकं मुरडतात. पण बिअरच्या याच कडवट चवीला थोडासा ट्विस्ट देत 'बिअर कॉकटेल' हा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. कॉकटेल म्हणजे कुठल्याही मद्ययुक्त दोन किंवा अधिक पेयांचे मिश्रण केले तर पिण्यास सुसह्य अशी बिअर तयार होते



ब्लडी मेरी, पिनाकोलाडा, लाँग आयलंड आइस टीमार्गारिटा असे क्लासिक कॉकटेल पब आणि रेस्टॉरंटमध्ये अनेकांनी ट्राय केले असतील. पण 'बिअर कॉकटेल' हा प्रकार एकदा तरी ट्राय कराच. एकच प्रकारची बिअर पिऊन कंटाळा आलेल्यांनी तर नक्कीच ट्राय करावा. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिअर कॉकटेल सर्व्ह करणाऱ्या पब आणि रेस्टॉरंटची माहिती देणार आहोत. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही नक्कीच बिअरचा वेगळा आस्वाद घेऊ शकतायाची चव बिअरसारखी कडवट नसेल तर थोडी आंबट-गोड असेल.


ब्रुबोट इटरी अॅण्ड पब ब्रुवरी

तुम्ही बिअर प्रेमी असाल तर मुंबईतल्या या पबला नक्की भेट द्या. ब्रु केलेल्या वेगवेगळ्या बिअर आणि बिअर कॉकटेलचे भन्नाट कलेक्शन तुम्हाला इथं पहायला मिळेल. 'बिअर मार्गारिटा' हा प्रकार तुम्ही इथं नक्की ट्राय करा. यामध्ये टकिला, फ्रेश लाइम, क्राफ्ट बिअरसिंपल सिरप आणि ट्रिपल सेक या पेयांचं मिश्रण असतं



याशिवाय 'लार्जर पॅशन' हा एक भन्नाट प्रकार इथं आहे. व्डोडका, पॅशन फ्रुटपीच प्युरी आणि क्राफ्ट बिअर या पेयांपासून लार्जर पॅशन हे बिअर कॉकटेल बनते. बिअरसोबत तुम्ही चिकन विंग्स, बारबिक्यू चिकन पिझ्झा, ग्रिल फिश या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

कुठे : जी ०१ अॅण्ड १०१, मोरीया लँडमार्क १, न्यू लिंक रोड, विरा देसाई, मुंबई

वेळ : सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते संध्याकाळी १२, शनिवार-रविवार दुपारी १२ ते रात्री १२



द आयरिश हाऊस

'द आयरिश हाऊस' ही लोकप्रिय रेस्टॉरंट साखळी नेहमीच हटके राबवण्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला जर क्लासिक कॉकटेल आणि नेहमीचीच बिअर पिऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही इथले बिअर कॉकटेल नक्कीच ट्राय करा. इनवर्टेड बर्ड हे इथलं बिअर कॉकटेल तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळाच अनुभव देईल. यात व्डोडका, अॅपल ज्यूसपॅशन फ्रुटचा ज्यूस आणि पाईंट ऑफ बिअर यांचं मिश्रण असेल. मुंबईत फक्त इथेच अशा प्रकारची बिअर तुम्हाला पिता येईल



याशिवाय क्लासिक शँडी आणि ब्लॅक वेव हे दोन प्रकार देखील इथं उपलब्ध आहेत. क्लासिक शँडीमध्ये ड्रॉट लार्ज आणि स्पार्कलिंग फ्रेश लाईम असते.तर ब्लॅक वेवमध्ये ड्रॉट लार्ज आणि एक्स्प्रेसो हे दोन पेयं मिक्स केलेली असतील.

कुठे : फिनिक्स मिल कम्पाऊंड, हाय स्ट्रिट फिनिक्स, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल

        दुसरा मजला, इनऑर्बिट मॉल, लिंक रोड, मालाड(.)

वेळ : दुपारी १२ ते रात्री १



) डिशक्याऊ (Dishikiyaon)

एकच प्रकारची बिअर पिणं म्हणजे जाम कंटाळवाणं. हटके बिअर ट्राय करायच्या असतील तर नक्कीच इथं भेट द्या. नावीण्यपूर्व बिअर कॉकटेल्स बनवण्यासाठी डिशक्याऊ लोकप्रिय आहे. 'क्रिस्पी विट बिअर विथ लीची' या कॉकटेलचा आस्वाद नक्की घ्या



त्यानंतर 'बिअर सँग्रिया' हा प्रकार ट्राय करा. यात पॅशन फ्रुट, एल्डर फ्लावर ड्रिंक आणि चवीला फळांचे तुकडे त्यात असतातएल्डर फ्लावर ड्रिंक हे फुलांपासून बनवण्यात येते. वाईन आणि बिअरमध्ये त्याचा वापर होतो. बॉरबॉन बिअर सार या कॉकटेलमध्ये काफिर लाईम लिफ (लिंबाच्या झाडांची पानं) आणि गव्हाची बिअर असे मिश्रण यात असते

कुठे : द कॅपिटल, ब्लॉक जी१, बीकेसी रोड, जी ब्लॉक बीकेसी, वांद्रे(पू.)

वेळ : दुपारी १२ ते रात्री १



लाईट हाऊस कॅफे

'लाईट हाऊस कॅफे'च्या मेन्यूमध्ये जवळपास बिअर कॉकटेलचे ५ वेगवेगळे प्रकार आहेत. बिअर कॉकटेल ट्राय करण्यासाठी वरळीतील हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. इथं हर्ब बिअरपिंक लेमनेड आणि पॉवर बिअर या तीन कॉकटेलला अधिक पसंती दिली जाते



इथले बिअर कॉकटेल्स हे बिरा बिअरपासून बनवले जातात. बिअरसोबत इथल्या हटके फूड डिशेशचा आस्वाद नक्की घ्या

कुठे : ९ ग्राऊंड फ्लोअर, सनविले बॅनक्विट्स, सिद्धार्थ नगर, वरळी

वेळ : सकाळी ९ ते रात्री १.३०



५) ट्रू ट्रॅम ट्रंक

बिअर प्रेमींची पहिली पसंती 'ट्रू ट्रॅम ट्रंक'लाच मिळेल. कारण इथं बिअर कॉकटेलचे भन्नाट कलेक्शन ट्राय करायला मिळेल. 'बिअर बॉम्ब' हा भन्नाट प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल. यामध्ये बिअर आणि आलं यांचं मिश्रण असतं. 'क्युबर' या बिअर कॉकटेलमध्ये बिअर आणि काकडीचे तुकडे अॅड केलेले असतात. याशिवाय 'अॅपल सायडर बिअर', 'चँग बिअर' हे दोन प्रकारही तुम्हाला आवडतील.



कुठे : पहिला मजला, ऑपटिअन्स शोरूम जवळ, व्ही. एल. मेहता रोड, जुहू

वेळ : संध्याकाळी ६.३० ते रात्री १.३०



हेही वाचा

मुंबईत इथे मिळेल स्पेशल बीअर ट्रीट!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा