गोरेगावमधील ७००० घरांचा प्रकल्प रेंगाळणार, म्हाडाला कंत्राटदार मिळेना

गोरेगावमधील प्रकल्पाच्या बांधकामासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यानं निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली आहे. निविदेला २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर हा प्रकल्प कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

गोरेगावमधील ७००० घरांचा प्रकल्प रेंगाळणार, म्हाडाला कंत्राटदार मिळेना
SHARES

गोरेगावसारख्या मोक्याच्या ठिकाणी म्हाडाला ७००० घरं उपलब्ध करून देणारा १८ एकर जागेवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. याचं कारण म्हणजे या प्रकल्पाच्या बांधकामासाठी मुंबई मंडळाला कंत्राटदारच मिळेनासा झाला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यानं निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली आहे. निविदेला २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर हा प्रकल्प कागदावरच राहण्याची शक्यता आहे.


न्यायालयीन लढाईचं यश

२५ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर म्हाडाने मिळवलेल्या पहाडी येथील २५ एकर जागेवर सर्वसामान्यांसाठी घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे २५ एकरपैकी १८ एकर जागेवर पहिल्या टप्प्यात घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


आराखड्यात चूक

या १८ एकर जागेवर याआधी ३ एफएसआयनुसार ५,११९ घरं बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आली. पण काही दिवसांनंतरच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना आपण केलेल्या एका चुकीची जाणीव झाली. ती चूक म्हणजे या जागेवर ४ एफएसआय असताना ३ एफएसआयनुसार अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता.


८ एप्रिल अंतिम तारीख

ही चूक लक्षात आल्यानंतर मुंबई मंडळानं नव्यानं ४ एफएसआयनुसार आराखडा तयार केला आहे. या नव्या आराखड्यानुसार आता म्हाडाला ५११९ एेवजी ७००० घरं मिळणार आहे. या नव्या आराखड्यानुसार मुंबई मंडळानं निविदांमध्येही बदल केला होता. या निविदेनुसार ८ एप्रिलला निविदा सादर करण्याची अंतिम तारखी होती. पण निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने मुंबई मंडळाने आता २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


मुदतवाढ का दिली?

मुंबई मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एल अॅण्ड टी आणि बी. जी. शिर्के या दोन कंपन्यांनी निविदा भरण्यास उत्सुकता दर्शवली होती. त्यातील एल अॅण्ड टी कंपनीकडून घरं बांधण्यासाठी ज्या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब केला होता त्या पद्धतीनुसार ७००० पैकी २५०० ते ३००० घरं बांधली जाणार होती. त्यामुळे एल अॅण्ड टी कंपनी निविदेतून बाहेरच पडली. शिर्के या एकाच कंपनीकडून निविदा सादर झाल्यानं मुंबई मंडळानं निविदेला मुुदतवाढ दिल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.हेही वाचा-

म्हाडाची यंदा 'परवडणारी' लॉटरी! अत्यल्प-अल्प गटासाठी ७८३ घरं!

यंदाही म्हाडा लाॅटरीचा मुहूर्त चुकणार?संबंधित विषय