Advertisement

सिद्धीविनायक मंदिराच्या इमारतीला तडे, लवकरच करण्यात येणार डागडुजी

सिद्धीविनायक मंदिराची डागडुजी करण्यात येणार आहेत. एका ऑडिटमध्ये मंदिराच्या इमारतीला तडे गेले आहेत, हे समोर आलं.

सिद्धीविनायक मंदिराच्या इमारतीला तडे, लवकरच करण्यात येणार डागडुजी
SHARES

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिर गेल्या दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलं आहे. पण लवकरच या मंदिराची डागडुजी करण्यात येणार आहेत. एका ऑडिटमध्ये मंदिराच्या इमारतीला तडे गेले आहेत, हे समोर आलं. अहवालांनुसार, संगमरवरी दगडांना लावण्यात आलेलं आवरण निघत आहे. त्यामुळे मंदारावर असलेल्या कळसा जवळच्या भागाला मजबुतीकरणाची आवश्यक्ता आहे.

विश्वस्तांनी अद्याप या डागडुजीसाठी किती खऱ्च येणार आहे हे उघडे केलं नाही. नूतनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान मंदिर पूर्णपणे किंवा अंशतः बंद असेल. आदेश बांदेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या कामासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.

सिद्धीविनायक मंदिर १७९२ सालात बांधलं गेल्याचं बोललं जातं. पण सरकारी कागदपत्रांनुसार हे मंदिर १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये प्रथम बांधलं गेलं. सिद्धीविनायक मंदिर पहिलं छोटं होतं. गेल्या दोन दशकांत बर्‍याच वेळा मंदिराचं नुतनीकरण झालं आहे.

१९९१ साली महाराष्ट्र सरकारनं या मंदिराच्या भव्य बांधकामासाठी २० हजार चौरस फुट जमीन दिली. सध्या सिद्धिविनायक मंदिराची इमारत पाच मजली आहे. इथं गणेश गृह, गणेश म्युझियम त्याव्यतिरिक्त दुसर्‍या मजल्यावर रुग्णालय आहे. या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. त्याच मजल्यावर स्वयंपाकघर आहे. तिथून थेट एक लिफ्ट गर्भगृहात येते. पुजारी गणपतीसाठी बनवलेले प्रसाद आणि लाडू याच मार्गानं आणले जातात.


धोकादायक इमारतींबाबत अडचणीच्या निवारणास म्हाडाकडून हेल्पलाइन


सिद्धिविनायक गणपती मंदिर गरजूंना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असते. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तर ट्रस्टनं पुढाकार घेतला आहे. ट्रस्टनं यापूर्वी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा इथल्या ऑपरेशन दरम्यान २३ जून रोजी शदीह झालेले 182 व्या बटालियन सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरातील गणपती मंडळांना यापूर्वी मूर्तींची उंची कमी ठेवण्यासाठी आणि २२ ऑगस्टपासून १० दिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यास सांगितलं होतं. यावर्षी कोरोनाव्हायरसचे संकट लक्षात घेऊन उत्सवांवर अनेक निर्बंध घातले गेले आहेत.

लालबाग सर्वजणिक उत्सव मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी गणेशोत्सवाबद्दल बोलताना सांगितलं की, यावर्षी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केलं जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मूर्तींची उंची लहान असावी जेणेकरुन त्यांचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केलं जावं. महाराष्ट्रासारख्या राज्यात COVID 19 सारख्या आजाराशी झुंज देत आहोत. स्वत:चे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी लोकांची जास्त गर्दी होऊ न देणं आणि सामाजिक अंतर प्रोटोकॉलचं पालन करणं फार कठीण आहे.हेही वाचा

गिरगावमधील मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ४८ मजली इमारत

मुंबईतील 8 पुलांच्या दुरुस्तीची कामं रखडली

Read this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा