बाप्पासाठी उभारली इमारत

  Dadar
  बाप्पासाठी उभारली इमारत
  मुंबई  -  

  वरळी : सगळ्यांचा आवडणारा सण म्हणजे गणपती. घरगुती गणपतीबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येकाच्या घरात विराजमान झालेल्या गणेशाची मूर्ती बघायची आवड सर्वांनाच असते. पण हल्ली बरेच जण आपल्या बाप्पासाठी काहीतरी वेगळी सजावट करण्याचा प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. मुंबईतल्या वरळी येथे राहणाऱ्या माने या कुटुंबियांनी बाप्पासाठी असाच एक आगळावेगळा देखावा तयार केले आहे. सयाजी माने हे महानगर पालिकेचे कर्मचारी आहेत त्यामुळे हे कुटुंब गेल्या २८ - २९ वर्षापासून वरळीतल्या महानगरपालिकेच्या वसाहतीत रहातात. काही महिन्यातच ते निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा अक्षय याने बाप्पासाठी  ते राहात असलेल्या  महानगर पालिकेच्या वसाहतीचा देखावा उभारला आहे. यामध्ये त्यांच्या इमारतीला असलेला  रंग आणि तशाच फरशा वापरत हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. तसेच ते राहत असल्यापासून जेवढे इंजीनियर त्यांच्या डिपार्टमेंटला होऊन गेलेत त्यांचीही नावे डेकोरेशनमध्ये  सालासकट लिहिली आहे. काहीच दिवसात ते निवृत्त होणार असल्याने आपल्या आयुष्यातले काही क्षण देख्याव्यातून मांडल्याचे माने कुटुंबियांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.