राणीबागेतल्या मोल्टची स्पेशल बर्थडे पार्टी!


  • राणीबागेतल्या मोल्टची स्पेशल बर्थडे पार्टी!
  • राणीबागेतल्या मोल्टची स्पेशल बर्थडे पार्टी!
  • राणीबागेतल्या मोल्टची स्पेशल बर्थडे पार्टी!
SHARE

भायखळ्याच्या रानीबागेमध्ये शुक्रवारी बर्थडे पार्टी झाली. केक कापला गेला. बर्थडे बॉयला नवे कपडेही घातले गेले. आणि सगळ्यांनी मिळून बर्थडे बॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. पण हा वाढदिवस रानीबागेतल्या कोणत्याही अधिकाऱ्याचा, कर्मचाऱ्याचा किंवा दुसऱ्या कोणत्या पर्यटकाच्या मुलाचा नव्हता. तर हा वाढदिवस होता रानीबागेतल्या 7 पेंग्विनपैकी सर्वात लहान पेंग्विन असलेल्या मोल्टचा!

दक्षिण कोरियाहून रानीच्या बागेमध्ये आणण्यात आलेल्या 7 पेंग्विनपैकी मोल्टचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुक्रवारी मोल्ट 2 वर्षांचा झाला. यावेळी पेंग्विनची देखभाल करणाऱ्या डॉ. मधुमिता काळे आणि त्यांच्या टीमने सेलिब्रेशनसाठी विशेष तयारी केली होती. यावेळी मोल्टला लाल रंगाचा टी-शर्टही घातला होता.

याशिवाय मोल्टसाठी एक स्पेशल फ्रोजन फिश आईस केकही बनवण्यात आला होता. बोंबील आणि मांदेली या माशांपासून हा केक बनवला होता. यावेळी खास आपल्यासाठी बनवलेला केक आणि आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहुणे बघून मोल्टनेही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला असेल, यात शंका नाही!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ