'या' कंपन्या विदेशी आहेत यावर तुमचा विश्वासच बसणार नाही!


SHARE

दैनंदिन जीवनात आपल्या वापरात असलेली अनेक उत्पादनं ही विदेशी आहेत. पण आपल्याला त्याची माहितीच नसते किंवा आपण त्या उत्पादनांची माहिती करून घेणं आवश्यक समजत नाही. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या देशी वाटतात. पण मुळात या कंपन्या विदेशी आहेत. कोणत्या आहेत या कंपन्या?


मॅगीदोन मिनिटांमध्ये तयार होणारी 'मॅगी' खाणं कुणाला नाही आवडत? पण तुम्हाला माहित आहे का मॅगी बनवणारी कंपनी देशी नाही विदेशी आहे? मॅगीचं उत्पादन करणारी कंपनी ही मुळात स्वित्जर्लंडची आहे. 'नेस्ले' असं या कंपनीचं नाव आहे. नेस्ले ही कंपनी फक्त मॅगीच नाही तर अनेक वस्तूंचं उत्पादन करते.


बाटा'बाटा' कंपनीची ओळख सांगण्याची खरंतर गरजच नाही. बस नाम ही काफी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाटा कंपनीचं नाव भारतीय वाटतं. पण बाटा ही कंपनी विदेशी असून बाटाचे शूज, चप्पल प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. झेक रिपब्लिक या देशातून बाटा कंपनीचे चप्पल, शूज ही उत्पादनं जगभरात पोहोचवली जातात.  


हिंदुस्तान युनिलिवर'हिंदुस्थान युनिलिवर'च्या फक्त नावात हिंदुस्तान आहे. पण मुळात ही कंपनी विदेशी आहे. हिदुस्थान युनिलिवर इंग्लंडच्या कंपनीचा एक भाग आहे. भारतात व्यापार करण्यासाठी या कंपनीनं हिंदुस्थान युनिलिवर या नावानं नोंदणी केली आहे. अन्नपूर्णा मीठ, ब्रुक बाँड, किसान केचअप, पेप्सोडेंट आणि क्लोजअप सारखी अनेक उत्पादनं ही कंपनी बनवते.


टाईडटाईड कंपनीनं बनवलेली डिटर्जंट पावडर घराघरात वापरली जाते. टाईडच्या जाहिरातींना पाहून वाटणार नाही की ही एक विदेशी कंपनी आहे. पण मुळात टाईडचं उत्पादन अमेरिकेतील 'प्रोक्टर अँड गँबल' ही कंपनी करते. फक्त भारतातच नाही, तर अनेक देशात टाईडच्या उत्पादनांची विक्री होते.


लाइफबॉय साबणतंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफबॉयलाइफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा...ही टॅग लाइन प्रत्येकाच्याच लक्षात असेल. लाइफबॉय साबण अनेक घरांमध्ये आजही वापरला जातो. सर्वात जुने आणि स्वस्त उत्पादन अशी लाइफबॉयची ओळख आहे. या कारणामुळेच लाइफबॉय साबणाची भारतीय बाजारपेठेत अधिक विक्री होते. लाइफबॉय साबण देखील विदेशी कंपनी हिंदुस्थान युनिलिवरचं उत्पादन आहे.हेही वाचा

ऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स!


संबंधित विषय